• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ शाळेच्या शुभ्रा सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका

by Manoj Bavdhankar
July 14, 2025
in Guhagar
124 1
0
Shubhra Surve's academic double bang
244
SHARES
696
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवोदय विद्यालय प्रवेशा बरोबरच शिष्यवृत्तीत तालुका ग्रामीण भागात प्रथम क्रमांक

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा तवसाळ नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा निलेश सुर्वे हिची राजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड जाहीर झाली आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेत पाच विद्यार्थ्यांमध्ये शुभ्रा सुर्वे हिचा अग्रक्रमांक(९२%) आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालांमध्ये गुहागर तालुका ग्रामीण विभागातून शुभ्रा सुर्वे हिने प्रथम क्रमांक(७२%) पटकावला आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील भाजपाचे नेतृत्व करणारे श्री.निलेश विश्वनाथ सुर्वे आणि काताळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांची शुभ्रा ही थोरली कन्या आहे. Shubhra Surve’s academic double bang

शुभ्राने इयत्ता पहिलीपासुनच आपल्या सर्वांगीण शैक्षणिक कौशल्याची चुणूक दाखवली आहे. शालेय स्तर, केंद्र स्तर, बीट स्तरावर विविध स्पर्धांमध्ये तिने आपले कौशल्य दाखवून दिले होते. वकृत्वामधे तीचे विशेष नैपुण्य आहे. “कल्पवृक्ष” या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या तवसाळच्या सुर्वे परिवारातील नवोदय विद्यालयांमध्ये पात्रता परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन प्रवेश घेणारी शुभ्रा ही “५ वी” विद्यार्थिनी आहे. श्री रोहन प्रमोद सुर्वे, सौ ऋतुजा रोहन सुर्वे, कु.मृण्मयी जयंत सुर्वे, कु. सार्थक सचिन सुर्वे या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयामधून शिक्षण पुर्ण यशस्वी उज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे. Shubhra Surve’s academic double bang

शुभ्राच्या यशामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे मुख्याध्यापक श्री संदीप खंडगावकर, सहशिक्षक श्री रविंद्र राठोड यांचे मोलाचे योगदान आहे. शुभ्राच्या यशस्वीतेसाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तवसाळ पंचक्रोशीचे खोत मोहनबंधु गडदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जगदीश गडदे,  ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री विज्ञान सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री सत्यवान गडदे, ग्रामपंचायत उपसरपंच श्री प्रसाद सुर्वे, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे, राजेश सुर्वे, प्रदीप सुर्वे, श्याम गडदे, विजय शिवकर, उदय शिरधनकर, मनिषा मयेकर, प्रितम सुर्वे, कीरण गडदे, मोहिनी सुर्वे, मनस्वी सुर्वे, अभिसलाम वाडकर, हर्षदा गडदे, केंद्रप्रमुख चिपळूणकर सर यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचाली करता शुभेच्छा दिल्या आहेत. Shubhra Surve’s academic double bang

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShubhra Surve's academic double bangटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.