संकलन- प्रियांका दिदी (संपर्क नंबर +917249046379)
अंबेजोगाईची श्रीयोगेश्वरी बर्याच कोकणस्थांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तश्रृंगी हे देवीची मुख्य साडेतीन शक्तिपीठे आहेत व इतर अनेक उपपीठे आहेत. परंतु अंबांबाईच्या नावाने नावाजलेले इंजेजोगाई हे एकमात्र शक्तीपीठ आहे. या देवीच्या हातात इतर शस्त्र- आयुधांच्या जोडीला परडी देखील आहे. असे देवीच्या इतर कुठल्याच रूपांच्या हातात दिसत नाही. म्हणूनच या देवीची भक्ती करणार्याकडे परडी व पोत असतात. अशा या अद्वितीय देवीचे क्षेत्र अंबेजोगाई या तालुक्याच्या ठिकाणी आहे. बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बीड जिल्ह्यात हे क्षेत्र आहे. Shri Yogeshwari of Ambejogai
श्रीक्षेत्र योगेश्वरी मंदिर
श्रीक्षेत्र अंबेजोगाई गावातून जयंती नदी वहाते म्हणून अंबेला पूर्वी जयंतिका म्हणूनही ओळखले जात असे. क्षेत्र अंबेजोगाई यादव राजघराण्याच्या उत्तरकालीध आहे असे म्हणतात. हे मंदिर स्थापन होऊन १३०० वर्ष पूर्ण झाली आहेत. दक्षिणमुखी महाद्वारातून प्रवेश केल्यावर महाद्वारावर नगारखाना आहे. या महाद्वारापासून जवळच उत्तराभिमुख महाद्वाराजवळ लक्ष वेधून घेणारी दीपामाळ आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. पूर्वाभिमुख महाद्वारातून पुढे गेल्यावर मंदिराचे एक उंच वे इतर चार लहान शिखरे असलेले मंदिर आहे. मुख्य शिखर पाच मजली असून ते सत्तर फुट उंच आहे. Shri Yogeshwari of Ambejogai
शिखाराच्या पहिल्या मजल्यावर रामायण महाभारतातील प्रसंग तर दुसर्या मजल्यावर देवीचे द्वादश अवतार! तिसर्या मजल्यावर दशावतार, चौथ्या मजल्यावर नवग्रह आणि पाचव्या मजल्यावर सप्तऋषी कोरलेले आहेत. जोगाईच्या या उंच आणि भव्य शिखराचे बांधकाम देवीभक्त व गावातील प्रतिष्ठित भक्तांच्या प्रयत्नाने झाले आहे. अनेकांनी स्वखुषीने शिखरासाठी व मंदिरासाठी आर्थिक मदत केली आहे. Shri Yogeshwari of Ambejogai
मुख्य मंदिर
मुख्य मंदिर प्रवेशासाठी पूर्व, पश्चिम व उत्तर बाजूस दरवाजे आहेत. पश्चिम दरवाजाजवळ भांडारगृह आहे. दरवाजाजवळचा छोटा सभामंडप ओलांडून मोठ्या सभामंडपाकडे जाता येते. मोठमोठ्या दगडी खांबांवर मंदिराचे छत आहे. छतबांधणीतील दगडरचना म्हणजे बांधकामाचा अप्रतिम नमुनाच आहे. भक्कम बांधकाम असलेले हे छत सुंदर आणि विविध कोरीव कामाने नटलेले आहे. Shri Yogeshwari of Ambejogai
योगेश्वरी दर्शन
मुख्य सभागृहात प्रवेश करताच जगन्माता योगेश्वरीचा तेजःपुंज शेंदरी तांदळा नजरेस पडतो. या दर्शनमार्गावर अनेक ठिकाणी चांदीची नाणी ठोकलेली आहेत. योगेश्वरीची मूर्ती मुखवटा स्वरीपात आहे. तिचा आकार ओंकारस्वरुपी आहे. डोळ्यात रागीट भाव आहेत. मुखवट्याचे उग्र रुप आहे. दैत्याच्या वधासाठी तिने अवतार घेतल्यामुळेच तिचे रुप असे उग्र आहे. पण दैत्यवधाबरोबर भक्तांच्या कल्याणासाठीही ती अवतरली आहे हे विसरुनू चालणार नाही. तिची मूळ मूर्ती शेंदूरपुटात झाकली गेली आहे. Shri Yogeshwari of Ambejogai
इतर मूर्ती व सभामंडप
मंदिराच्या सभामंडपात महाकाली माता, तुळजाभवानी. केशविराज, गणपती, देवीची भोगमूर्तीही आहे. मंदिराच्या उत्तर दरवाजातून बाहेर पडल्यावर समोर होमकुंड आहे. होमकुंडावर भव्य सभामंडप बांधला आहे. येथे दंतासूराची प्रतिमा आहे. या मंडपात धार्मिक कार्ये होतात. मंदिरालगत अंतर्गत पराकोट असून त्याला पूर्व, पश्चिम व उत्तर या तिन्ही दिशांना दरवाजे आहेत. पश्चिम दरवाजा बंद असून उत्तर व पूर्व द्वारावर नागारखाना आहे. येथे दिवसातून तीन वेळा सनई व चौघडा वाजवला जातो. Shri Yogeshwari of Ambejogai
पराकोटात अनेक ओवर्या आहेत. एका ओवरीत रेणूकामातेची मूर्ती आहे.
अनेक तीर्थे
मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वारासमोरील दीपमाळेजवळ सर्वेश्वर नावाचे तीर्थ आहे. ह्या तीर्थावर पश्चिम बाजूस सर्वेश्वर, रुद्रभैरव व महारुद्र यांची मंदिरे आहेत. दीपमाळेजवळ चार संताच्या समाध्या आहेत. पश्चिमद्वाराबाहेर मायामोचन तीर्थ आहेत. या तीर्थाजवळ काळभैरव, महारुद्र, गणेश आणि नारदेश्वर यांची छोटी मंदिरे आहेत. Shri Yogeshwari of Ambejogai