• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री देव व्याडेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

by Ganesh Dhanawade
February 16, 2026
in Guhagar
53 1
0
Shri Dev Vyadeshwar Festival
105
SHARES
299
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : शहरातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वराच्या महाशिवरात्र उत्सवाला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. यानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्त ठेवलेल्या प्रचिन नाण्यांच्या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. Shri Dev Vyadeshwar Festival

गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्वर मंदिराचा महाशिवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्री सकाळी ७ ते ९.३० या वेळेत श्रींची षोडशोपचार पूजा व लघुरूद्र, सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील विविध मंडळांची सुस्वर भजने पार पडली. दुपारी १२ वाजता महाआरती, रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत श्री व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखली यांचे वारकरी किर्तन पार पडले. रात्री १० वाजता श्रींची ढोल पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्थानिक ग्रामस्थासह ज्यांचे श्री देव व्याडेश्वर कुलदैवत आहे, अशी सर्व मंडळी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. Shri Dev Vyadeshwar Festival

Shri Dev Vyadeshwar Festival

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कसाल येथील ओंकार कदम यांनी संकलीत केलेल्या इ.स. न १ पुर्वीची २२० देशातील नाणी व चलनाचे प्रदर्शन भरवीण्यात आले आहे. विध्यार्थ्यांना हे प्रदर्शन कुतूहल वाटतं आहे. Shri Dev Vyadeshwar Festival

दरम्यान, १७ ते १९ फेब्रुवारी सलग तीन दिवस श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड यांच्यावतीने यावर्षीही व्याडेश्वर महोत्सव शहरातीलच पोलिस परेड मैदान येथे मोठया दिमाखात साजरा होत आहे. १७ फेबुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. गणेश वंदनेने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. जादुचे प्रयोग हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता विघ्नेश जोशी यांचे पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देताना ‘मराठी असे आमची मायभूमी’ असा गप्पा, गाणी व किस्से हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर स्थानिक कलाकारांचे विविध नृत्य सादर केले जाणार असून यामध्येच मान्यवरांचे सत्कार केले जाणार आहे. शेवटी लकी ड्रॉ व कोकणातील प्रसिद्ध संकासूर नमन सादर केले जाणार आहे. Shri Dev Vyadeshwar Festival

Shri Dev Vyadeshwar Festival

१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता पुन्हा कलाआविष्कार देवरूख यांचे कोकणी संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतीक कार्यक्रम तसेच शिवगर्जना हा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर केडीसी ग्रुप यांचे विविध नृत्य, मान्यवरांचे सत्कार, लकी ड्रॉ व कोकणातील प्रसिद्ध संकासूर नमन सादर केले जाणार आहे. Shri Dev Vyadeshwar Festival

१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता लोकनाटय नमन मंडळ मुंबई यांचे शिवभक्त कोकण हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठा कार्यक्रम सादर होणार आहे. त्याच्यबरोबर मान्यवरांचे सत्कार, लकी ड्रॉ व शेवटी कोकणातील प्रसिद्ध नमन सादर करून महोत्सवाची सांगता केली जाणार आहे. या महोत्सवासाठी कोकणातील विविध खादय पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच अबालवृद्धांसाठी विविध प्रकारचे खेळ यामध्ये आकाश पाळणा, मुलांची घसरगुंडी, विविध गेम्स आदी मनोरंजनही ठेवण्यात आले आहे. Shri Dev Vyadeshwar Festival

Tags: FestivalGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShri Dev VyadeshwarShri Dev Vyadeshwar Festivalटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजश्री देव व्याडेश्वर
Share42SendTweet26
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.