दि. 17 ते 19 फेब्रुवारी रोजी रंगणार श्री देव व्याडेश्वर महोत्सव
गुहागर, ता. 13 : शहरातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त १५ फेब्रुवारी पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी इसवीसन १ पुर्वीच्या प्राचिन नाण्यांच्या प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी असा तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी दिली. Shri Dev Vyadeshwar Festival
गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्वर मंदिराचा महाशिवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात दरवर्षी साजरा केला जातो. देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे व विश्वस्तांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत माहीती देताना दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत श्रींची षोडशोपचार पूजा व लघुरूद्र, सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील विविध मंडळांची सुस्वर भजने, दुपारी १२ वाजता महाआरती, रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत श्री व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखली यांचे वारकरी किर्तन. रात्री १० वाजता श्रींची ढोल पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यादिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कसाल येथील ओंकार कदम यांनी संकलीत केलेल्या इसवी सन ०१ पुर्वीची २२० देशातील नाणी व चलनाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वेळेत श्री व्याडेश्वर मदिरात तब्बल १००० नाणी व चलनाचे प्रदर्शन सर्व भाविकांना पहाण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. Shri Dev Vyadeshwar Festival

दि. १७ ते १९ फेब्रुवारी सलग तीन दिवस रंगणार श्रीदेव व्याडेश्वर महोत्सव शहरातीलच पोलिस परेड मैदान येथे मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. दि. १७ फेबुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. गणेश वंदनेने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. जादुचे प्रयोग हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता विघ्नेश जोशी यांचे पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देताना ‘मराठी असे आमची मायभूमी’ असा गप्पा, गाणी व किस्से हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर स्थानिक कलाकारांचे विविध नृत्य सादर केले जाणार असून यामध्येच मान्यवरांचे सत्कार केले जाणार आहे. शेवटी लकी ड्रॉ व कोकणातील प्रसिद्ध संकासूर नमन सादर केले जाणार आहे. Shri Dev Vyadeshwar Festival
दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता पुन्हा कलाआविष्कार देवरूख यांचे कोकणी संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतीक कार्यक्रम तसेच शिवगर्जना हा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर केडीसी ग्रुप यांचे विविध नृत्य, मान्यवरांचे सत्कार, लकी ड्रॉ व कोकणातील प्रसिद्ध संकासूर नमन सादर केले जाणार आहे. Shri Dev Vyadeshwar Festival
दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता लोकनाटय नमन मंडळ मुंबई यांचे शिवभक्त कोकण हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठा कार्यक्रम सादर होणार आहे. त्याच्यबरोबर मान्यवरांचे सत्कार, लकी ड्रॉ व शेवटी कोकणातील प्रसिद्ध नमन सादर करून महोत्सवाची सांगता केली जाणार आहे. Shri Dev Vyadeshwar Festival
या महोत्सवासाठी कोकणातील विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच अबालवृद्धांसाठी विविध प्रकारचे खेळ यामध्ये आकाश पाळणा, मुलांची घसरगुंडी, विविध गेम्स आदी मनोरंजनही ठेवण्यात आले आहे. या महाशिवरात्र महोत्सवात सर्व भक्तांनी तसेच जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान विश्वस्तांनी केले आहे. Shri Dev Vyadeshwar Festival
