Guhagar News: गुहागर तालुक्यातील पहिले एमकेसीएलचे (MKCL) प्रशिक्षण केंद्र असलेल्या श्री कॉम्प्युटर या संगणक प्रशिक्षण संस्थेला एमकेसीएलच्या विभागीय बैठकीत गौरविण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी आणि शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी एमएससीआयटीचा (MSCIT) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
गुहागर तालुक्यात संगणक प्रशिक्षण सेवा देणारी श्री कॉम्प्युटर ही सर्वात जुनी (21 वर्षांपूर्वीची) प्रशिक्षण संस्था आहे. गुहागर तालुक्यात संगणक संच सहज मिळणे दुरापास्त होते त्या काळात (2001) श्री कॉम्प्युटर ही संस्था संतोष मोरे यांनी सुरु केली. सुरवातीच्या काळात संतोष मोरे यांना प्रशिक्षण संस्था चालविण्यासाठी समाजात संगणक साक्षरता, संगणक युगाविषयी जाणिव जागृती करावी लागली. त्यासाठी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावून संगणक प्रशिक्षणाविषयी संतोष मोरे माहिती सांगत फिरत असत. शुन्यातून उभ्या राहीलेल्या या संगणक प्रशिक्षण केंद्राला एमकेसीएलचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळाल्यानंतरही विद्यार्थ्यांचा शोध संपला नव्हता. गुहागर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात शिक्षणासोबत संगणक प्रशिक्षण आवश्यक असण्याचा विचार त्यांनी रुजविला. सुरवातीच्या काळात अनेक गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली. काही विद्यार्थ्यांची फी स्वत:च्या खिशातून भरली तर काही वेळा नुकसानही सोसले. असा प्रवास करता करता आज श्री कॉम्प्युटर या संस्थेने संगणक प्रशिक्षणामध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. Shree Computer felicitated by MKCL
एमकेसीएलचे सर्व अभ्यासक्रम शिकविण्यासाठी या संगणक प्रशिक्षण केंद्रात अद्ययावत संगणक कक्ष, स्वतंत्र क्लासरुम आदी सुविधा आहेत. Klic चे 20 हून अधिक अभ्यासक्रम इथे शिकविले जातात. प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला परिपूर्ण ज्ञान मिळावे म्हणून संतोष मोरे, सौ. राधिका मोरे व त्यांचे अन्य प्रशिक्षक मेहनत घेतात. विद्यार्थ्याला त्याच्या कोर्सच्या वेळ व्यतिरिक्त जादा प्रशिक्षण दिले जाते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी या संस्थेच प्रशिक्षण घेतले आहे. Shree Computer felicitated by MKCL
Shree Computer felicitated by MKCL
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमकेसीएलच्या सर्व अधिकृत प्रशिक्षण केंद्रांची विभागीय बैठक (Regional Meeting) शुक्रवार दि. ०२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये श्री कॉम्प्युटरचे संतोष मोरे यांचा एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. विणा कामत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हातील एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षण केंद्र प्रमुख उपस्थित होते. या सन्मानाबाबत बोलताना संतोष मोरे म्हणाले की, अनेक वर्ष प्रामाणिपणे, सचोटीने घेत असलेल्या परिश्रमांचे सार्थक एमकेसीएलने केलेल्या गौरवामुळे झाले आहे. Shree Computer felicitated by MKCL