आमदार भास्कर जाधव ; गुहागरमध्ये श्रावण भजन महोत्सव
गुहागर, ता. 05 : सध्या सणांमधील स्वरूप बदलत चालले आहे, संस्कृती लोप पावत चालली आहे की काय, अशी भीती वाटत असतानाच, श्रावण भजन महोत्सवातून संस्कृती, धर्म, रूढी परंपरेची जोपासना केली जात आहे. असे प्रतिपादन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व अखिल भजन सांप्रदायितवर्धक मंडळ गुहागर तालुका त्यांच्या सहकार्याने गुहागर शहरातील भंडारी भवन सभागृहामध्ये श्रावण भजन महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. Shravan Bhajan Festival in Guhagar
या महोत्सवाची सुरुवात शहरातील श्रीदेव व्याडेश्वर मंदिरापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये व हरिनामाच्या घोषामध्ये सवाद्य दिंडी काढण्यात आली. अखिल भजन सांप्रदायितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. Shravan Bhajan Festival in Guhagar

आमदार भास्कर जाधव यापुढे बोलताना, आज गुहागर सारख्या ठिकाणी एका छताखाली एका आयोजनाखाली तब्बल 35 भजने सादर करण्यात येणार आहेत. भजनाची ही महती आणि परंपरा यातून कायम राखण्याचे काम केले जात असून आपल्या देशाची संस्कृती धर्म रूढी व परंपरा टिकवून ठेवली जात आहे. देशातील अनेक जाती-धर्माचे संतांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रबोधन केले. हिंदू धर्माचे महत्त्व आणि या धर्माचे मन किती मोठे आहे, हे संपूर्ण जगाला पटवून सांगितले. या देशात सोन्याचा धूर निघत होता यामुळे या देशाला लुटण्यासाठी अनेक आक्रमणे झाली. परंतु ही आक्रमणे केवळ सोन्या चांदीची लूट करण्यासाठी नाहीतर हिंदू संस्कृतीची धर्माची लूट करण्याचाही त्यांचा उद्देश होता. मात्र साधुसंतांची येथील अध्यात्मिक बैठक एवढी मजबूत होती की, ते त्यांना शक्य झालं नाही. भजनातून देवाजवळ जाण्याचा व देवाला आपलेसे करण्याचा मार्ग आहे. भजन असू दे, नमन असू दे, जाकडी नृत्य येथील कलाकारांना शासकीय मानधन मिळवून देण्याचे भाग्य मला लाभले. आजही या सर्व कलाकारांनी केलेली मागणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. आजच्या या भजन कार्यक्रमाला जाताना थोडी भीती वाटत होती. आजचा भजन महोत्सव येथे सुरू असला तरी राज्यात मात्र तमाशा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी कोपरखळी मारली. Shravan Bhajan Festival in Guhagar
त्यावेळी अखिल भजन सांप्रदायितवर्धक मंडळ गुहागर तालुक्याचे अध्यक्ष सागर मोरे, उपाध्यक्ष संतोष पांचाळ, सचिव संदेश हुमणे, खजिनदार अभय साठले व सर्व सदस्य त्याचबरोबर राज्याचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे, सचिव प्रमोद हर्याण व सर्व सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर श्री व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, स्नेहा वरंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, पद्माकर आरेकर, साहिल आरेकर, अजय खातू, शामकांत खातू, राज विखारे, संतोष वरंडे, अमरदीप परचुरे आधी उपस्थित होते. Shravan Bhajan Festival in Guhagar