गुहागर, ता. 29 : शहरातील भंडारी भवन येथे रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका तर्फे श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. Shravan Bhajan Festival in Guhagar
या भजन महोत्सवानिमित्त दि. 03 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता व्याडेश्वर देवस्थान ते भंडारी भवन दिंडी सोहळा, सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन, 10.30 वाजता गुहागर तालुक्यातील भजन मंडळाचे भजन सादरीकरण तसेच आयोजक मंडळातील ज्येष्ठ कलावंतांचे भजन सादरीकरण, दुपारी 12 वाजता साठ वर्षावरील वृद्ध कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. Shravan Bhajan Festival in Guhagar

या भजन महोत्सवाचे तालुक्यात प्रथमच आयोजन करण्यात आले असून आपली भजन परंपरा टिकून राहणे, कलाकारांना आपली काला जोपासता यावी, भजन माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे, वृद्धपकाळात कलाकारांना दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण केलेल्या कलेच्या सेवेचा शासनाकडून मिळणारा मोबदला मिळावा यासाठी सर्व भजनी कलाकारांनी संघटित राहावे, यासाठी या भजनी मेळाव्याचे आयोजन केले आहे, असे अखिल भोजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ तालुका गुहागर चे अध्यक्ष सागर मोरे यांनी सांगितले. Shravan Bhajan Festival in Guhagar
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर शेठ जाधव, माजी आमदार विनय नातू उपस्थित राहणार असून सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. Shravan Bhajan Festival in Guhagar