पालकमंत्री ना. सामंत यांना अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाचे निवेदन
गुहागर, ता. 04 : भजन कलेला शासन दरबारी राजाश्रय मिळावा, भजन कलेला लोककलेचा दर्जा मिळावा, त्यांच्या मानधन व अन्य भजनी कलाकारांच्या मागण्यांसाठी शासन दरबारी दाखल घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य (रजि.) मुंबई संलग्न अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांच्यावतीने राज्याचे उदयोग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नेत्रा ठाकूर याच्याकडे सुपूर्द करण्यात आले. Shravan Bhajan Festival at Guhagar

भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने गुहागर येथील भंडारी भवन येथे एक दिवसीय श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदरील निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, भजन कलेला शासन दरबारी राजाश्रय मिळावा, भजन कलेला लोककलेचा दर्जा मिळावा. कलाकारांना मिळणारे मानधन योजनेमध्ये उत्पन्नाची अट रु. ४०,०००/- आहे, ती रु.१००,०००/- पर्यंत वाढवून मिळावी. मानधनाचा कोटा जिल्हा पातळीवर भजनी कलाकरांसाठी वाढवून मिळावा. जे सरकारतर्फे कलाकरांसाठी पुरस्कार मिळतात. ते भजनी कलाकरांनाही प्राप्त व्हावेत. त्याचप्रमाणे इतर कलाकारांना सरकारकडून सर्व फायदे मिळतात तसे भजनी कलावंतांना मिळावे. कलाकरांना मिळणारे विमा सुरक्षा व इतर संरक्षण भजनी कलाकारांना मिळावेत, शासनाचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्यामध्ये शासनातर्फे भजन महोत्सव ही घेण्यात यावेत. भजन हि कला सामुहिक असल्याने मुख्य बुवा आणि सहकारी पखवाज वादक, सहगायक कोरस मंडळी असते. त्यामुळे मुख्य गायकाप्रमाणे सहगायक कोसर आणि पखवाज वादक यांना ही मुख्य गायकाप्रमाणे मानधन मिळावे. या भजनी कलाकारांच्या मागण्या असून, या मागण्यांची पूर्तता शासन दरबारी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Shravan Bhajan Festival at Guhagar
यावेळी निवेदन देण्यासाठी भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ राज्य अध्यक्ष भगवान लोकरे, सचिव प्रमोद हर्याण, गुहागर अध्यक्ष सागर मोरे, सचिव संदेश हुमणे, श्री. मुणगेकर बुवा, वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर आदी उपस्थित होते. Shravan Bhajan Festival at Guhagar