• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरके सरांचे धक्‍कादायक निधन

by Mayuresh Patnakar
December 28, 2024
in Guhagar
759 8
0
Shocking death of Korke Sir

Shocking death of Korke Sir

1.5k
SHARES
4.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. २७ : Shocking death of Korke Sir शहरातील कनिष्‍ठ महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी असलेले उप मुख्याध्यापक विलास कोरके सर यांचे धक्‍कादायक निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी स्वयंपाकघरात कोरकेसर मृतावस्थेत पडलेले होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्याने त्यांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी सायंकाळी शव विच्छेदनाची प्रक्रिया संपल्यावर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर गावी मेंढापूर (ता. पंढरपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्र्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब आहे. मुलाचे वैदयकिय शिक्षण पूर्ण झाले असून मुलीचे वैद्यकिय शिक्षण सुरु आहे. Shocking death of Korke Sir

विद्यार्थीप्रिय कोरके सर

1994 मध्ये विलास पांडुरंग कोरके हे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये जीवशास्‍त्राचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांचे मुळगांव पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर. एमएसस्सी, बी.एड. पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारला होता. जीवशास्‍त्र हा त्याचा विषय होता. कोरकेसर केवळ विषय शिक्षक नव्हते. जीवशास्‍त्र हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यामुळेच या विषयातील नवे घटनाक्रमही ते अभ्यासायचे. अभ्यासक्रम शिकवतानाच त्या अनुषंगाने येणारी अवांतर माहिती देखील ते विद्यार्थ्यांना सांगायचे. म्हणूनच जीवशास्‍त्र विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख बनली होती. 2013 पर्यंत 11 वी व 12 वी शास्‍त्र या विद्याशाखांबरोबर माध्यमिक वर्गांतही जीवशास्‍त्र विषय शिकवत असतं. 2013-14 मध्ये कनिष्‍ठ महाविद्यालय उच्‍च महाविद्यालयाच्या इमारती लगतच्या नव्या इमारतीमध्ये गेले तेव्हापासून त्यांचा गुहागर हायस्कुलमधील विद्यार्थ्यांशी संपर्क तुटला. सध्या त्यांच्याकडे उपमुख्याध्यापक आणि कनिष्‍ठ महाविद्यालयाची जबाबदारी होती. 31 मे 2024 रोजी ते निवृत्त होणार होते. Shocking death of Korke Sir

निवृत्तीपूर्वी शिल्लक असलेल्या रजा संपवायच्या म्हणून त्यांनी 10 ते 12 दिवसांची रजा घेतली होती. या रजेच्या काळात ते आपल्या गावी मेंढापूरला गेले होते. निवृत्ती जवळ आलेली असल्याने दिवाळीच्या सुट्‍टीत त्यांनी आपल्या कुटुंबाला देखील गावीच पाठवले होते. 25 डिसेंबरला सायंकाळी रजा संपवून ते पुन्हा गुहागरला आले होते.

Shocking death of Korke Sir

विलास कोरके सर 25 डिसेंबरला सायंकाळी आपल्या गावावरुन घरी आले होते. गुरूवारी 26 डिसेंबरला ते कनिष्ठ महाविद्यालयात येणे अपेक्षित होते. परंतू ते आले नाहीत. सहकारी शिक्षकांना वाटले की, त्यांनी रजा वाढविली असेल किंवा तब्येत बरी नसल्याने ते शाळेत आले नसतील. शुक्रवारी (ता. 27 डिसेंबर) देखील कोरके सर शाळेत आले नाहीत. एका शिक्षकांना रजा हवी असल्याने त्यांनी कोरके सरांना फोन केला होता. मात्र त्यांनी तो उचलला नाही. दरम्यान सरांच्या पत्नीने गुहागर हायस्कुलचे मुख्याध्यापक कांबळे सरांना आणि अन्य शिक्षकांना फोन केला. 25 तारखेला गावावरुन आल्यापासून सरांनी फोन उचलला नसल्याचे सांगितले. या फोननंतर तातडीने शाळेतील काहीजण चिंतामणी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. सुरवातीला मुख्य दरवाजा ठोठवला. मात्र आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे घराच्या खिडक्या उघडून कोरके सरांना हाक मारणे सुरु होते. एकाने स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत डोकावले तेव्हा कोरके सर स्वयंपाकघरात जमीनीवर पडलेले दिसले. मग बाकीच्यानीही तिकडे धाव घेतली. अधिक नीट पाहीले तेव्हा कोरके सरांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तातडीने ही गोष्‍ट पोलीसांना सांगण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. महत्प्रयासाने घर उघडले. तेव्हा लक्षात आले की, स्वयंपाकघरात चहा करतानाच कोरके सरांना हृदयविकाराचा तीव्र झडका बसला असावा. ओट्याशेजारी असलेल्या फ्रीजचा आधार घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असावा. मात्र ही घटना नक्‍की कधी घडली हे मात्र कळलेले नाही. Shocking death of Korke Sir

सदर दु:खद घटना कोरके सरांच्या घरी कळवण्यात आली. त्यानंतर त्यांचा मुलगा आणि अन्य नातेवाईक गुहागरला आले. त्यानंतर पोलीसांनी पंचनामा, शव विच्छेदन आदी बाबी पूर्ण केल्या. सर्व कार्यवाही संपल्यावर कोरके सरांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हायस्कुल शोकमग्न

कोरके सरांच्या निधनाने गुहागर हायस्कुलवर शोककळा पसरली. सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे सर्व अनाकलनीय आणि धक्‍कादायक होते. कोरके सरांना कोणताही आजार नव्हता. त्यामुळे सरांना हृदयविकाराचा तीव्र झटका कसा बसु शकतो. सर असे अचानक कसे सोडून गेले. अशा सरांचे असे एकटे असताना निधन व्हायला नको होते. अशा अनेक चर्चा आज गुहागरमध्ये सुरु होत्या. सकाळी ही बातमी समजल्यानंतर माजी विद्यार्थी, सरांचे परिचित, गुहागरातील नागरिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे सातत्याने चौकशी करत होते. सर्वांसमोर दु:ख व्यक्‍त करता येत नाही आणि सरांवरील प्रेमामुळे होणारी चौकशी टाळू शकणे अशक्य असल्याने सर्वांचीच अवस्था केविलवाणी झाली होती. Shocking death of Korke Sir

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShocking death of Korke Sirटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share597SendTweet373
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.