• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विसापूर गावात ठाकरे गटाला धक्का

by Ganesh Dhanawade
October 7, 2023
in Guhagar
213 2
0
Shock to Thackeray faction in Visapur
419
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

गुहागर, ता. 07 : गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर तालुक्यातील विसापूर गावातील वानवाडी ग्रामस्थांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन भाजप तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे आणि सरचिटणीस सचिन ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केला. यासाठी भाजपाचे पदाधिकारी मंगेश जोशी, आसिफ भाई दळवी, राहूल भागवत, रमेश बारगोडे यांनी विशेष प्रयत्न केले. Shock to Thackeray faction in Visapur

भाजपा तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी माजी आमदार डॉ विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करून वानवाडीतील ग्रामस्थांना शाश्वत विकासाची खात्री दिली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचवून लोकांनी स्वयंरोजगारासाठी पुढे आले पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय निर्मिती करून रोजगाराची संधी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य देण्याचा विश्वास दिला. Shock to Thackeray faction in Visapur

यावेळी संतोष शिरगावकर, चंद्रकांत किर्वे, विजय किर्वे, श्रीकांत किर्वे, दत्ताराम अर्जुन किर्वे, दिलिप किर्वे, अर्जुन गणपत किर्वे, अशोक रामचंद्र किर्वे, निलेश किर्वे, अल्पेश किर्वे, सुरेश किर्वे, योगेश किर्वे, प्रकाश किर्वे, राकेश किर्वे, मनोहर कदम, शैलेश किर्वे, दत्ताराम केशव किर्वे, सचिन किर्वे आदी ग्रामस्थांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्ते मूळचे राष्ट्रवादी त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्या समवेत ठाकरे गट शिवसेनेचे काम करत होते. Shock to Thackeray faction in Visapur

Tags: Bharatiya Janata PartyBJPGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShock to Thackeray faction in VisapurThackeray Groupटॉप न्युजठाकरे गटताज्या बातम्याभाजपाभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.