• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का

by Ganesh Dhanawade
February 3, 2023
in Politics
404 4
0
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करताना गुहागर शहरातील पदाधिकारी

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करताना गुहागर शहरातील पदाधिकारी

794
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर शहर कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात

गुहागर : गेल्या आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आता हीच राजकीय उलथापालथ आ. भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघात होताना दिसत आहे. गुहागर शहरातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे तोंडावर आलेल्या गुहागर नगरपंचायत निवडणुकीमुळे आ. भास्कर जाधव यांना धक्का मानला जात आहे. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

       रत्नागिरी जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार आणि एक माजी आमदार बाळासाहेबांची शिवसेना गटात सहभागी झाले आहेत. तर  आ. भास्कर जाधव शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आ. जाधव यांची सेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिंदे आणि ठाकरे यांच्या या वादात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राज्यातील घडी बसविण्यासाठी गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव आक्रमकपणे उद्धव ठाकरे गटाची भूमिका मांडत आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांच्याच मतदार संघातील शिवसेनेचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात टप्प्याटप्प्याने सामील होत आहेत. यामध्ये दिपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, रोहन भोसले यांनी किरण तथा भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गुहागर तालुकाप्रमुख म्हणून दिपक कनगुटकर यांची निवड करण्यात आली. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group

आता दिपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, रोहन भोसले यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे गुहागर शहरप्रमुख निलेश मोरे, माजी युवासेना शहरप्रमुख राकेश साखरकर, उपशहरप्रमुख मनीष मोरे, ऍड. सुशील अवेरे, विभागप्रमुख विरेश बागकर, प्रथमेश चाफेरकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group

शहरातील प्रमुख आणि जुन्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे आगामी गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहरात कदाचित वेगळे चित्र पहावयास मिळेल. या पक्षप्रवेशानंतर शहरातील व तालुक्यातील अनेक उद्धव ठाकरे गटातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत  प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShivsainiks from Guhagar entered in Shinde groupटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share318SendTweet199
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.