• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पूजा आवळे चे भाषण

by Guhagar News
February 19, 2026
in Guhagar
42 0
0
Shivaji Maharaj Jayanti at Guhagar Agar
82
SHARES
235
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर आगारात प्रथमच सार्वजनिक छ. शिवाजी महाराज जयंती साजरी

गुहागर, ता. 19 : गुहागर आगारात प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कु पूजा शिवाजी आवळे या विद्यार्थिनीचे भाषण लक्षवेधी ठरले. Shivaji Maharaj Jayanti at Guhagar Agar

गुहागर आगारात दरवर्षी प्रशासकीय जयंती साजरी होते. मात्र यावर्षी प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सर्व प्रथम आगार प्रमुख अशोक चव्हाण यांचे सह गुहागर तालुका प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्या नंतर छ शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून आगार प्रमुख अशोक चव्हाण यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. Shivaji Maharaj Jayanti at Guhagar Agar

यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे, आगार प्रमुख अशोक चव्हाण, सहाय्यक कार्यशाळा अधिकारी मंदार कदम, आगार लेखा कार स्नेहल पालकर, वरिष्ठ लिपिक शंकर केंद्रे, प्रवीण वळंजू, सुनील पवार, अस्मित चव्हाण, राजा गायकवाड, गणेश वालम, सिद्धेश लाकडे, रविकुमार गायकवाड, दिलीप रिंडे, के डी सकपाळ, सुषमा घोंगे, अश्विन शेठ, केशव दांडेगावकर, प्रवीण भांगरे, आर बी गायकवाड, रामा पुंड यांचे सह चालक वाहक व प्रवाशी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. Shivaji Maharaj Jayanti at Guhagar Agar

यावेळी आपल्या प्रास्ताविकमध्ये बोलताना रामा पुंड यांनी छ. शिवाजी महाराज यांचे कार्याचा गौरव केला. तर आगार प्रमुख यांनी उपस्थितीताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले. यावेळी सर्वांना आगाराच्या वतीने मोती चुर बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले. जयंतीचा गोडवा वाढविण्यासाठी सर्वांनी मेहनत करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. Shivaji Maharaj Jayanti at Guhagar Agar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShivaji Maharaj Jayanti at Guhagar Agarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share33SendTweet21
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.