गुहागर, दि. 21: तालुक्यातील अंजनवेल गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा. येथे छत्रपती शिवाजी महाराजाची 392 वी जयंती साजरी करण्यात आली. ही जयंती शाळेचे मुख्याध्यापक अशफाक कुपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. Shiva Jayanti in Urdu School Anjanvel


यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शादमा कोतवडेकर च्या कुराण पठणांनी झाली. शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. Shiva Jayanti in Urdu School Anjanvel
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पदवीधर शिक्षक समीर बामणे यांनी केली. हाश्मी अ.गफूर उपशिक्षक यांनी शिवाजी महाराज संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये माझीन खतीब, सालीम लांबते, नोमान कानेकर, मारिया आचरेकर, अय्यान कारभारी, महेक कारभारी, जुवेरिया पंची यांनी छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अशपाक रूपे त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले . Shiva Jayanti in Urdu School Anjanvel