हेदवतड येथील मेळाव्यात आ. जाधव यांच्याकडून समाचार
गुहागर, ता. 08 : मला सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होणार असून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी गेले आहेत अशा शब्दात आ. जाधव यांनी समाचार घेतला. वेळणेश्वर जि.प. गटातील हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी आ. जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व विशेष करुन रामदास कदम यांचा समाचार केला. Shiv Sena Thackeray group’s rally at Hedvatad

ते पुढे म्हणाले, वेळणेश्वर व पडवे गटातील नेत्रा ठाकूर व महेश नाटेकर हे पदाधिकारी केवळ स्वार्थासाठी गेले आहेत. नेत्रा ठाकूर यांना जिल्हा नियोजन मंडळावर जायचे असल्याने त्यांनी हा खटाटोप केला असून, त्यांच्याबरोबर इतरांनाही त्यांनी नेऊन त्यांचे राजकीय भवितव्य नष्ट केले आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीत मी असताना ठाकूर यांना मीच नियोजन मंडळावरघेतले होते. मात्र, त्याचे श्रेय पालकमंत्र्यांना देत आहेत. याचाच अर्थ त्यांचे यापूर्वीच बोलणे झाले असावे म्हणून त्यांनी हा प्रवेश केला असावा, अशी शंका आ. जाधव यांनी व्यक्त केली. Shiv Sena Thackeray group’s rally at Hedvatad

मी वेळणेश्वरची खोती संपवली म्हणून आज मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र मीच त्यांना संपविणार आहे, असा इशारा आ. जाधव यांनी दिला. आज जो खारवी समाज त्यांच्याबरोबर गेला आहे. त्याच खारवी समाजाचे वेळणेश्वर येथील खारवी सभागृह पाडण्यासाठी नवनीत ठाकूर यांनी त्यावेळी संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. आता पुन्हा सीआरझेडच्या नियमावलीमुळे हे सभागृह पाडण्याची नोटीस आली असून ते वाचविण्यासाठी मीच उपयोगी येणार असल्याचे नमूद केले. साखरीआगर जेटीसाठी निधी मी मंजूर करुन आणला आहे तिचे बांधकाम मीच पूर्णत्वास नेणार आहे. वेळणेश्वर गटातील धूपप्रतिबंधक बंधारे वा रस्ते असोत ही कोटीची कामे मीच मंजूर करुन आणली असून ही कामे थांबवायला मला वेळ लागणार नाही, असे म्हणाले. Shiv Sena Thackeray group’s rally at Hedvatad
मंत्री असताना मच्छिमारांच्या घराखालच्या जमिनी कायम असण्याचा विषय असो, त्यांच्या कोणत्याही नुकसानभरपाईचा विषय असो, या सर्व समस्या मी सोडविल्या आहेत. मी गुहागरमध्ये सुरुवातीला आलो तेव्हा येथे असा कोणता विकास होता. हे मला सोडून जाणाऱ्यांनी सांगावे, येथील विकास हा केवळ माझ्यामुळेच झाला आहे, असेही आ. जाधव यांनी नमूद केले. Shiv Sena Thackeray group’s rally at Hedvatad
पक्षप्रवेश कार्यक्रमाला येथे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आले. त्यांच्यासमोर पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी येथील एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, उपस्थित नेते यावर काहीही बोलले नसून हा प्रश्न विचारणारे पदाधिकारी हे खुळचट आहेत अशीही टीका आ. जाधव यांनी केली. रामदास कदम यांचा समाचार घेताना आ. जाधव म्हणाले, ते माझ्यावर पाया पडल्याची टीका करतात मात्र, तेच माझ्या दोनवेळा पाया पडल्याची टीका करुन त्यांनी माझ्याविरोधात बोलताना विचार करावा, असा इशारा दिला. आता पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, गावांमध्ये शाखेचे फलक लावावेत व पेटून उठावे. असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या सभेला जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा महिला संघटक सौ. अरुणा आंब्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Shiv Sena Thackeray group’s rally at Hedvatad