• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नावाचे गहाणखत करून टाकावे

by Mayuresh Patnakar
January 31, 2022
in Politics
17 0
0
MVA fail on all fronts

MVA fail on all fronts

34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ. विनय नातू : सर्वोच्च न्यायालयाने आघाडी सरकारला चपराक दिली

गुहागर, ता. 29 : १२ आमदारांचे निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आघाडी सरकारला सणसणीत चपराक दिली आहे. आता तरी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना शहाणपणाच्या गोष्टी ऐकवाव्यात. किंवा शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नावाचे गहाणखत करुन टाकावे. अशी प्रतिक्रिया भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी व्यक्त केली आहे. Shiv Sena should mortgage the party to NCP

डॉ. नातू यांनी म्हटले की, १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव कायद्याच्या दृष्टीने दुर्भाग्यपूर्ण, असंवैधानिक, बेकायदेशीर आणि कायद्याच्या दृष्टीने कुचकामी आहे. हा निर्णय हकालपट्टीपेक्षा वाईट आहे. सभागृहात या मतदारसंघाचे प्रतिनिधी नसताना कोणीही प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यामुळे ही फक्त सदस्याला शिक्षा होत नाही तर संपूर्ण मतदारसंघाला शिक्षा होते”.  अशी टिप्पणी मा. न्यायालयाने केली आहे. आघाडी सरकारने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचे ठरविले असल्याने ते एकापाठोपाठ एक बेकायदा निर्णय घेत आहेत. आ. प्रताप सरनाईक यांना बेकायदा बांधकामाबद्दलचा दंड माफ करण्याचा निर्णयही अशाच बेकायदा पद्धतीने घेण्यात आला आहे. Shiv Sena should mortgage the party to NCP

१२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय मागे घ्या अशी विनंती भारतीय जनता पार्टीने आघाडी सरकारकडे वारंवार केली होती. मात्र सत्तेच्या गुर्मित असलेल्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्यानंतरही सत्ताधाऱ्यांची गुर्मी उतरण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच या आमदारांना विधीमंडळात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील , अशी भाषा भास्कर जाधव यांच्यासारखे नेते करीत आहेत. मात्र या विषयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अभ्यासू नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ही देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. Shiv Sena should mortgage the party to NCP

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.