• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालगडावर सायकलप्रेमींची शिवजयंती

by Guhagar News
February 23, 2022
in Guhagar
16 0
0
Shiv Jayanti of cyclists on Palgad

Shiv Jayanti of cyclists on Palgad

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दापोली व खेड सायकलींग क्लबचा उपक्रम

गुहागर, दि. 23 :  दापोली सायकलिंग क्लब आणि खेड सायकलिंग क्लबतर्फे, या वर्षीचा शिवजन्मोत्सव रविवारी पालगड किल्ल्यावर साफसफाई आणि गडपुजन करुन साजरा करण्यात आला. यासाठी हे सायकलप्रेमी ७० किमी सायकल चालवत घेरापालगड किल्ल्यावर पोहोचले. Shiv Jayanti of cyclists on Palgad

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक गडकिल्ले रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. घेरापालगड किल्ल्यावर आणि रस्त्यामध्ये दिसणारा प्लास्टिक कचरा, पिशव्या, रॅपर, बाटल्या गोळा करुन साफसफाई केली. गडपूजन करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विनायक वैद्य सर यांनी घेरापालगड किल्ल्याची आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल ऐतिहासिक माहिती सांगितली. सर्वांनी या गडकिल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली. Shiv Jayanti of cyclists on Palgad

Shiv Jayanti of cyclists on Palgad
Shiv Jayanti of cyclists on Palgad

या ७० किमीच्या सायकल राईड मध्ये सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी झाले होते. यामध्ये सर्वात लहान ११ वर्षाचा श्री खानविलकर, प्रेम पाटणे, सोहम कवळे, संचिता भाटकर, आर्या कवळे, शौर्या पेठे या चिमुकल्यांनीही यशस्वीपणे सहभागी होऊन ही सायकल राईड पूर्ण केली. या सायकल राईडचे नियोजन दापोली सायकलिंग क्लबच्या मिलिंद खानविलकर, विनय गोलांबडे, सुरज शेठ, परेश बुटाला, मृणाल खानविलकर, स्वानंद जोशी यांनी केले होते. Shiv Jayanti of cyclists on Palgad

Shiv Jayanti of cyclists on Palgad
Shiv Jayanti of cyclists on Palgad

तसेच खेड सायकलिंग क्लबच्या विनायक वैद्य, प्रितम पाटणे, अमित लढ्ढा, शैलेश पेठे, दिपक नलावडे, स्वरुप थरवळ, स्मिता वैद्य, विनायक कुडकर, केदार कवळे, हेमंत चिखले, आनंद कोळेकर आदी अनेकांनी सहकार्य केले आणि सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केली. Shiv Jayanti of cyclists on Palgad

सर्व सायकलप्रेमी नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करतात आणि इतरांनाही सायकल चालवण्यासाठी प्रेरीत करत असतात याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. Shiv Jayanti of cyclists on Palgad

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShiv Jayanti of cyclists on Palgadटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.