गुहागर, ता. 19 : तालुक्यातील तवसाळ खुर्द येथील ऐतिहासिक विजय गडावर तवसाळ खुर्द ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या दिमाखात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गुहागर तालुक्याच्या दक्षिण दिशेला आणि अरबी समुद्राच्या मुखावरती मोठ्या दिमाखदारपणे उभ्या असलेल्या विजय गडावर तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, “हर हर महादेव” अशा गगनभेदी घोषणा देत तवसाळ ग्रामस्थ आणि परिसरातील शिवप्रेमींनी आगमन केले. यावेळी श्री देव स्वयंभू गजानन देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेश सुर्वे यांच्य हस्ते शिवजयंतीच्या प्रारंभाचा नारळ वाढवत शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली. छत्रपतींच्या पुतळ्याला तवसाळ ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. Shiv Jayanti in Vijayagad of Tavasal

यावेळी जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर – १ यातील विद्यार्थ्यांनी श्री खंडगावकर, श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींच्या इतिहासाची माहिती सांगितली. शिवप्रेमी आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी उपस्थितांना विजयगड किल्ल्याचा पूर्वइतिहास मोजक्या शब्दात सांगितला. 2021-22 या वर्षात विजय गड किल्ल्याची साफसफाई करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे सह्याद्री प्रतिष्ठान रत्नागिरी, शाखा गुहागर यांचे यावेळी विशेष कौतुक आणि आभार व्यक्त करण्यात आले. या सफाई कामी सह्याद्री प्रतिष्ठानला विशेष सहकार्य करणारे तवसाळ खुर्द मधील प्रीतम सुर्वे, महेश सुर्वे , रत्नदीप गडदे,अजय नार्वेकर प्रणय सुर्वे, हर्षद सुर्वे, जयेश गडदे, प्रसन्न गवंडे, सागर जाधव, मनोज कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तर 2023 सालच्या शिवजयंती पुर्वी विजय गड परिसराची पुर्ण साफसफाई करण्याचा संकल्प तवसाळ ग्रामस्थ मंडळ आणि सह्याद्री प्रतिष्ठान रत्नागिरी यांनी केला. Shiv Jayanti in Vijayagad of Tavasal
यावेळी कातळे ग्रामपंचायत उपसरपंच प्रसाद सुर्वे, विजय शिवलकर, नंदकुमार मिशाळ,अशोक पड्याळ, विराज सुर्वे, ग्रामसेवक महेंद्र निमकर, अंगणवाडी सेविका छाया सुर्वे, मनीषा मयेकर, भक्ती सुर्वे, वृषाली शिवलकर, कस्तुरी शिवलकर, विजय नाचरे, विनायक कोळवणकर,नरेश गडदे, उदय शिरधनकर, किरण गडदे, तेजस शिवलकर,जगदीश गडदे,अक्षय पड्याळ, चंद्रकांत कवठेकर ,अमोल सुर्वे, आदित्य सुर्वे, अद्वीता सुर्वे, आर्यन सुर्वे,शरद सुर्वे,रुपेश सुर्वे, शुभम सुर्वे, केदार गडदे आदींसह तवसाळ, तवसाळ खुर्द, पडवे, कातळे परिसरातील बहुसंख्य शिवप्रेमी, शिवभक्त उपस्थित होते. Shiv Jayanti in Vijayagad of Tavasal
