• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 August 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिवभक्त कोकणचा संच देव पूजेचा देतोय सर्वोत्तम सेवा

by Guhagar News
August 1, 2025
in Ratnagiri
146 1
0
शिवभक्त कोकणचा संच देव पूजेचा देतोय सर्वोत्तम सेवा
286
SHARES
818
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : कोकणी माणसामध्ये औद्योगिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, कोकणचे सौंदर्य उद्योजकतेने जपता येईल ह्या विचाराने शिवभक्त कोकणची सुरुवात झाली. मुंबईत येऊन नोकरी करून कोकणच हित जोपासता येणार नाही हे संस्थापक निलेश नथुराम किंजळकर ह्यांच्या लक्षात येताच १ ऑक्टोबर २०१९ ला स्वतःची नोकरी सांभाळत ह्यांच्या विचारातून आणि सहकाऱ्यांच्या मदतीने ह्या कार्याची सुरुवात झाली.  बंधू केतन किंजळकर व अनिल किंजळकर सोबत सुविचारी शिवभक्त जोडले गेले, त्यात महत्वाचे म्हणजे युयुत्सु आर्ते सर, अनंत पाले सर यांचे विचार कार्याला सक्रिय करण्यास लाख मोलाचे ठरले, शंकर बाबा भुवड, सचिन टोले ह्यांचे आशीर्वाद उभारी देणारे बनले. Shiv Bhakta Pujasach

Shiv Bhakta Pujasach

पूजा संच चा जन्म हा २०२१ ला त्याची रूपरेषा आखली गेली. मात्र सुरुवात व्हायला २०२३ ची वाट पहावी लागली. मुंबईचा माणूस आपल्या नोकरी व्यवसायात बिझी असतो, गावाला जाण्यासाठी तो विशेष तळमळ करत असतो कारण प्रत्येक कोकणी माणसाच्या जिव्हाळयाचा विषय म्हणजे आपले गाव. धावपळीतून त्याचे कष्ट वाचावे व गावी सुलभ पोहचावे म्हणून निर्मिती झाली ती पूजा संचाची, त्यामध्ये मार्केटिंगची पकड घट्ट करत प्रदीप घरवेकर व आर्थिक नियोजन कल्पेश जाधव, विकास भुवड ह्यांच्या सिंहाच्या वाट्याने काम करायला सुरुवात झाली.  संच कसा प्रगल्भ ठरेल म्हणून प्रत्येक शिवभक्त आपले सर्वोत्तम देत राहिला, प्रणित काकवल, विशाल किंजळकर, वैभव पडये, मदन पंडव, परेश पतीये, राकेश करंडे, प्रवीण करंडे, वैभव साळवी ह्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. Shiv Bhakta Pujasach

त्याचप्रमाणे अनेक दिग्गज लोकांचे मार्गदर्शन पर आशीर्वादही महत्वाचे ठरले. त्यात अजय खातू साहेब, उदय गावडे,  शाहीर एकनाथ डीके,  आत्माराम करंडे, सुधीर साहेब सुर्वे ह्यांचे गुरूतुल्य मार्गदर्शन व सहकार्य हि संघटनेला चालना देणारे ठरले.   जाहिरातीसाठी २०२४ साली सोबत उभ्या राहिल्या प्राजक्ता सोलकर तसेच अनेक युटूबर्स त्याचप्रमाणे शिवभक्त प्रमुख व्यवस्थापक म्हणून  प्रथमेश भुवड, प्रणव पानगळे, साहिल डिके, उल्हास घाणेकर, सचिन भडवलकर, मंदार खांबे, गोपाळ करंडे, संभाजी धुमक, विनायक गावडे, दिनेश चव्हाण, सचिन झिमन, स्वप्नील तांबे, कल्पेश घाणेकर, प्रतीक भुवड  ह्यांनी विशेष योगदान दिले. त्याचप्रमाणे २०२४ साली वाढ होऊन अंकुर धनावडे, योगेश लाखन, शैलेश लाखन, नुतन सोलकर, प्रदीप म्हादे  ह्यांनी आपले नवीन व्यावसायिक म्हणून सुरुवात करून उत्तम व्यवसाय केला. Shiv Bhakta Pujasach

त्यामुळेच अनेक विचार एकनिष्ठ होत संच देव पूजेचा हा सेवेची जागा घेत कोकणच्या घर घरात पोहचत आहे. ह्याचा एका विचारातून तयार झालेल्या ह्या औद्योगिक कार्याला सगळ्यात महत्वाची ठरली ती लोकांची पसंती.  म्हणून पहिल्या वर्षाची १५०० संचाची पायरी दुसऱ्या वर्षीही डबल होत ३५७६ झाली. तिसऱ्या वर्षात २ वर्षाचा अनुभव घेत आणि दर्जेदार गोष्टींची निवड करत पूजा संच आता २०२५ साठी तयार होत आहे. तोही त्याच किमतीत आणि दर्जा वाढवत…!! Shiv Bhakta Pujasach

ह्या वर्षी मार्केट मध्ये विविध दुकानांमध्ये हि उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूजा संच विषयी सविस्तर माहिती साठी एक वेबसाईट हि बनवली आहे. ज्या माध्यमातून संचविषयी अधिक माहिती व डायरेक्ट ऑर्डर करता येईल, संच विक्रीसाठी नवोदित व्यावसायिक भागीदारांना संधी हि देण्यात आली आहे. उत्तम व्यावसायिक सहभाग दाखवणाऱ्या भागीदारास  शिवभक्तचा मी कोकणी उद्योजक ह्या पुरस्काराने सन्मानित करून त्यांची उद्योजकीय गुणवत्ता वाढवण्यासाठी रोख रकमेसह प्रबलन दिले जाईल, असा बहुउद्देशीय पूजा संच सर्वांगीण विचार करून  तयार करण्यात आला आहे. Shiv Bhakta Pujasach

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShiv Bhakta Pujasachटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.