जामसुत येथील सरस्वती विद्यामंदिरची विद्यार्थिनी
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर जामसुत विद्यालयाची विद्यार्थिनी कु. शिमरन प्रभाकर वीर हिने चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये लांब उडी क्रीडा प्रकारात अटीतटीच्या लढतीत द्वितीय क्रमांक पटकावल्याने तिची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे. Shimran Veer finishes second in long jump

या यशस्वी कामगिरीबद्दल तिचे आणि मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. माणगावकर सर यांचे सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शालेय समिती अध्यक्ष व सदस्य आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन होत आहे. आणि सिमरनला विभाग स्तरासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. Shimran Veer finishes second in long jump