प्राथमिक शिक्षकांच्या पगाराच्या दिरंगाई बाबत
रत्नागिरी, ता.03 : जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार माहे जानेवारी २०२२ पासून सातत्याने दिरंगाईने होत आहेत. परंतु आता पुन्हा माहे एप्रिल २०२२चा पगार रखडला आहे. याबाबत प्रशासन नेहमीच तांत्रिक कारणे पुढे करत असते. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर ८ जून रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप देवळेकर आणि सचिव श्री. सुरेंद्र रणसे व पदाधिकाऱ्यांनी यांनी केले आहे. Shikshak Sena movement

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार माहे जानेवारी २०२२ पासून सातत्याने दिरंगाईने होत आहेत. याबाबत मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्याकडेही कैफियत शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप देवळेकर मांडली होती. सामंत यांनी याबाबत संबंधितांना समज दिली होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांचे पगार झाले. परंतु आता पुन्हा माहे एप्रिल २०२२चा पगार रखडला आहे. याबाबत प्रशासन नेहमीच तांत्रिक कारणे पुढे करत असते. यामुळे प्राथमिक शिक्षकांचे कौटुंबिक नियोजन बिघडले असून सातत्याने होणा-या पगाराच्या दिरंगाई बाबत शिक्षकांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. Shikshak Sena movement

याच असंतोषाच्या भावनेला वाचा फोडण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेनेच्या वतीने ८ जून रोजी सकाळी १० वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप देवळेकर आणि सचिव श्री. सुरेंद्र रणसे व पदाधिकाऱ्यांनी यांनी केले आहे. शिक्षकांच्या प्रत्येक अडीअडचणीसाठी शिक्षक सेना सदैव तत्पर असून त्या सोडविण्यासाठी आपली संघटना सदैव पुढे असेल आणि हे घंटानाद आंदोलन यशस्वी करुन दाखविणारच असा विश्वासही यावेळी त्यानी व्यक्त केला. Shikshak Sena movement
