• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे नं.१ शाळेत शारदा उत्सव संपन्न

by Guhagar News
October 24, 2023
in Guhagar
98 1
0
Sharda Utsav held at Khodde School
193
SHARES
551
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पारंपरिक वेशभूषा, लेझीम,जाकडीनृत्य, ढोल ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं.१ या शाळेत सरस्वती (शारदा)  देवीचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. सरस्वती देवीची भव्य  मिरवणूक लेझीम व ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली व पारंपारिक वेशभूषा करून पारंपारिक जाकडी नृत्य व लेझीम नृत्य विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून करण्यात आले. Sharda Utsav held at Khodde School

Sharda Utsav held at Khodde School

सरस्वती देवीची स्थापना व पूजन उपसरपंच कुमारी पूजा गुरव, सदस्य श्री. नाना साळवी, उपाध्यक्ष सौ. अपर्णा साळवी, शिक्षणतज्ञ श्री. विलास गुरव, मुख्याध्यापक लोणारे सर, श्री. विनायक गुरव, कमिटी ,सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर देवीची महाआरती करण्यात आली व देवीला सुख-समृद्धी सर्वांना लाभो असे गाऱ्हाणेही घालण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक लोणारे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे पाटीवर पूजन केले. रांगोळी स्पर्धेत प्रथम विजेता गट- शाळेची शान, द्वितीय विजेता गट चिमण्यांची कला, तृतीय विजेता गट शाळेचा मान, तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांनी भजने व नृत्य सादर केली. Sharda Utsav held at Khodde School

Sharda Utsav held at Khodde School

यावेळी उपस्थित मान्यवर उपसरपंच कुमारी पूजा गुरव, सदस्य नाना साळवी, उपाध्यक्ष सौ. अपूर्ण साळवी, शिक्षण तज्ञ श्री.विलास गुरव, मुख्याध्यापक लोणारे सर, श्री.विनायक गुरव, श्री. कमलाकर गुरव, श्री.उदय साळवी, श्री. अनिल साळवी, श्री.बाबय गुरव, कमिटी सदस्य सौ. शर्वरी साळवी, सौ.निशा पांचाळ, सौ.सुषमा पांचाळ, सौ. संजना गुरव, सौ. कोळी मॅडम, सौ.मधुरा साळवी, सौ.योगिता पवार, सौ. शेवंती गुरव, सौ. पवार मॅडम, सौ. मयुरी साळवी, सौ.वैदही चव्हाण, सौ. भक्ती वैद्य, सौ. घाणेकर मॅडम, श्री. सुरेश पाटील, श्रीमती. प्राची साळवी, श्री गायकवाड सर, श्री मेश्राम सर, सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असं लोणारे सर यांनी सांगितले. Sharda Utsav held at Khodde School

Sharda Utsav held at Khodde School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSharda Utsav held at Khodde Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.