गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व कवी कालिदास दिन कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण यांच्या अध्यक्षतेत नुकताच साजरा करण्यात आला. Shahu Maharaj Jayanti at Patpanhale School
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका तसेच उपस्थित शिक्षकवृंद यांचे माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी मानसी संदीप पालकर हिने व प्रास्ताविक इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी मृण्मयी दत्ताराम जाधव हिने केले. Shahu Maharaj Jayanti at Patpanhale School


इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी अभिज्ञा दिनेश पवार , इयत्ता नववीमधील शमिका भिडे , इयत्ता दहावीमधील सई बारे , अनुश्री केतकर, मन्विता जोयशी या विद्यार्थिनींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज व कवी कालिदास यांच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे यांनी कवी कालिदास यांचे कार्य, संस्कृत विषयासाठी लाभलेले योगदान आदी मुद्यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ शिक्षक एस.बी.मेटकरी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन कार्य, समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराजांचे लाभलेले योगदान, शैक्षणिक व सामाजिक कार्य आदी मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन कार्य, समता व बंधुता या जीवन मूल्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांचे योगदान आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन करून सदरच्या कार्यक्रमात वकृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचे व कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. Shahu Maharaj Jayanti at Patpanhale School


यावेळी मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण, जेष्ठ प्रा.एस.एस.मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे , शिक्षक एस.बी.मेटकरी , एस.एम.आंबेकर , सौ.एन.पी.वैद्य आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. इयत्ता दहावीमधील विद्यार्थीनी समृद्धी सुरेश आंबेकर हिने वकृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थिनी, मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Shahu Maharaj Jayanti at Patpanhale School