• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ऑनड्युटी डॉक्टरांची खासगी क्लिनिकमध्ये सेवा

by Ganesh Dhanawade
November 8, 2023
in Guhagar
168 2
0
Services of onduty doctors in private clinics
330
SHARES
943
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सर्पंदश रुग्णाच्या उपचाराकडे पाठ, गुहागर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

गुहागर, ता. 08 : सर्पदंश रुग्णावर उपचार करण्यासाठी आपल्या डॉक्टर पत्नीला सांगून खासगी क्लिनिकमध्ये सेवा बजावणाऱ्या गुहागर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरविरोधात गुहागर येथील ग्रामस्थ राहुल उल्हास कनगुटकर यांनी कोल्हापूर उप संचालक आरोग्य सेवा यांसह आरोग्य मंत्री, पालकमंत्री, आमदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. Services of onduty doctors in private clinics

पत्रात म्हटले आहे की, राहुल कनगुटकर हे पालशेत येथील आपली बहीण सौ. आसावरी पिलणकर यांना सर्पदंश झाल्याने गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यावेळी तेथे शाळा तपासणी डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. शशांक ढेरे यांच्या पत्नी डॉ. सौ. गीता करे यांनी निदान करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान, दिलेल्या इंजेक्शनमुळे सौ. पिळणकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना विचारले की, आज डॉ. शशांक ढेरे यांची ड्युटी असताना ते आहेत कुठे, यावर त्यांच्या पत्नी डॉ. गीता करे यांनी डॉक्टर आजारी असल्याचे सांगून मी ड्युटी करत असल्याचे सांगितले. संबंधित नातेवाईकांनी याची खात्री करण्यासाठी आपली माणसे शृंगारतळी येथील डॉक्टरांच्या खासगी क्लिनिकमध्ये पाठवली. त्यावेळी डॉ. शशांक ढेरे हे शृंगारतळी येथील खासगी क्लिनिकमध्ये सेवा बजावत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. गीता करे यांनी डॉक्टर आजारी असल्याचे खोटे बोलून रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल केली. ही सर्व बाब गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकारिणीतील सदस्य सिध्दिविनायक जाधव यांच्यासमोर डॉ. सौ. गीता करे यांनी याची कबुली दिली. वरील विषयाचा गांभीर्याने विचार करुन कामचुकार डॉ. शशांक ढेरे यांच्यावर योग्यती कारवाई करावी, अशी मागणी राहुल कनगुटकर यांनी पत्राद्वारे केली आहे. Services of onduty doctors in private clinics

गुहागर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पूर्ण औषधोपचार मिळत नाहीत. उत्तम प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध असतानाही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने उपचाराविना रुग्णांना परत जावे लागते. परिणामी, रुग्ण खासगी रुग्णालयाकडे जातात. त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच एखाद्या गरोदर स्त्रीला प्रसुतीसाठी आणली असता नेहमी त्यांना उपजिल्हा रुग्णालय कामथे व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पाठवविले जाते. यातील सत्यता तपासण्यासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात आजपर्यंत प्रसुती किती झाल्या व किती प्रसुती केसेस पुढे पाठविण्यात आल्याची याची खात्री करावी, अशी मागणीही कनगुटकर यांनी केली आहे. Services of onduty doctors in private clinics

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarServices of onduty doctors in private clinicsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet83
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.