तळवली मळण येथील ग्रामसभेतून सेवा पंधरवडयानिमित्त विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 19 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर २०२५ जन्मदिनापासून ते २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मागांधी जयंती असा गुहागर तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. पहिल्या दिवशी ग्रामस्तरीय समीती स्थापन करण्यात आली आहे. तर शिवार फेरी काढून रस्त्यांची यादी तयार करून ग्रामसभेमध्ये मान्यता घेण्यात आली आहे. याचबरोबर भूमी अभिलेख विभागामार्फत रस्त्यांचे सिमांकन करण्यात आले असून नकाशा व अधिकार अभिलेखात नोंद करण्यात आली आहे. Service fortnight starts in Guhagar

गुहागरचे तहसिलदार परिक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा सुरू करण्यात आला आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष, तहसिलदार सदस्य सचिव तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, उपअधिक्षक भूमी अभिलेख, पोलिस निरिक्षक यांचा समावेश आहे. Service fortnight starts in Guhagar
या सेवा पंधरवडयात महसूल व वन विभाग शासन निर्णय २९ ऑगस्ट २०२५ नुसार ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पाणंद रस्त्याचे अभिलेख अद्यावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवुन सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये महसुल विभाग गावामध्ये उपलब्ध सर्व शेतरस्त्यांना विशिष्ट सांकेतांक देण्यात येणार आहे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेला गाव नमुना १ फ तयार केला जाणार आहे. अतिव- मण प्रकरणात रस्ता अदालतीचे आयोजन करून अतिक्रमणने निष्कासित केली जाणार आहेत. भूमी अभिलेख विभागाकडून गाव नाकाशांवर नोंद नसलेले व अतिव -मित रस्त्यांची मोजणी करणेत येवून रस्त्यांचे जीओ रेफरन्सींग करणे, सिमांकन व हद्दीचे सिमा चिन्ह स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाच्यावतीने शिवार फेरीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामविकास अधिकारी सहभागी होतील व रस्त्यांच्या प्रस्तावांबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभा ठराव करण्यात येतील. पोलिस विभागाकडून आवश्कतेनुसार अतिक्रमित रस्त्यांवरील दूर करणेसाठी पोलिस संरक्षण देणार आहेत. Service fortnight starts in Guhagar

दुसऱ्या टप्प्यात गुहागर तालुक्यातील सन २०११ पूर्वीचे रहिवास प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची यादी तयार करण्यात येवून सदरची अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करण्याबाबत व पट्टे वाटपाबाबत कार्यवाही होणार आहे. तिसऱ्या टप्यातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीले जाणार आहेत. तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी आवश्यक असलेले दाखले वाटप करण्यात येणार आहेत. कातकरी कॅम्प, शाळा तिथे दाखला, आयुष्यमान भारत कार्ड काढणे, सेवा विषयक बाबी पूर्ण करणे, महसूल अदालत घेणे, संगायो-इंगायो डीबटी ७५ प्लस आधारकार्ड काढणे, आजी-माजी सैनिक प्रस्ताव, कुळकायदा कलम ४३ ची अट कमी करणे. यांसारखे उपक्रम राबवीण्यात येणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार परिक्षित पाटील यांनी केले आहे. Service fortnight starts in Guhagar