गुहागर, ता. 07 : जेष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शृंगारतळी शिवसेना शहरप्रमुख नरेश पवार यांनी विकासकामे होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक आदींसह तालुक्यातील असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. Senior Shiv Sainik Naresh Pawar in BJP


नरेश पवार हे गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे पूर्वीपासून सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. शृंगारतळी शहरप्रमुख, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, पाटपन्हाळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद भूषविले आहे. गेली २५ वर्ष शिवसेनेचे काम करताना जनतेच्या अनेक अडचणी सोडविल्या आहेत. आ. भास्कर जाधव राष्ट्रवादीत असताना त्यांच्या समोर तालुक्यात शिवसेना वाढवण्यातहि त्यांचा मोठा वाटा आहे. Senior Shiv Sainik Naresh Pawar in BJP
या प्रवेशबाबत बोलताना नरेश पवार म्हणाले, लोकांची विकासकामे झाली पाहिजे. ही कामे भाजपाच्या माध्यमातूनच होऊ शकतात. म्हणून आपण भाजप मध्ये प्रवेश करत असल्याने सांगितले. गेल्या वर्षभरात गावासाठी ५० लाखाचा निधी आणला. गावाच्या विकासासाठी जे काय करावे लागत असेल, ते आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रवेशानंतर नरेश पवार यांना भाजपने ओबीसी मोर्चा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. Senior Shiv Sainik Naresh Pawar in BJP