• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विदयार्थ्यांनी क्षमता ओळखुन प्रयत्न करावा -स्वप्निल माने

by Ganesh Dhanawade
November 28, 2022
in Guhagar
110 1
0
विदयार्थ्यांनी क्षमता ओळखुन प्रयत्न करावा -स्वप्निल माने
216
SHARES
617
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व शास्त्र महाविदयालयात वाणिज्य मंडळ आणि करिअर गाईडन्स विभागातर्फे नुकताच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शना संदर्भात एकदिवशीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या परिक्षेत आयपीएस म्हणुन उत्तीर्ण झालेले स्वप्निल माने आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले व सध्या जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे लेखाधिकारी म्हणुन कार्यरत असणारे उमेश मगदुम उपस्थित होते.
सेमिनारच्या सुरुवातीला उमेश मगदुम यांनी स्पर्धा परिक्षांचे स्वरूप कसे असते व विदयार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी करावी हे सांगितले. त्यानी आपला प्रवास छोटयाशा खेडेगावातुन सुरू केला व अत्युच्च अशा शिखरावर कशा प्रकारे जावून पोहोचले. तसेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असूनदेखील कशा प्रकारे यश मिळविले हे स्पष्ट केले.
आयपीएस अधिकारी स्वप्निल माने यांनी आपले प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण कसे पार पाडले याची माहिती देताना घरच्या अडचणीमुळे कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. याची माहिती दिली. आर्थिक अडचणीमुळे पैशासाठी फळविक्रीच्या स्टॉलवरदेखील काम करून आपण आपले शिक्षण कसे पूर्ण केले याची माहिती देवून फळ विक्रेता ते आयपीएस अधिकारी असा आपला प्रवास कसा झाला हे सांगितले. त्यामुळे विदयार्थ्यांनी परिस्थितीचा बाउ न करता आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यश मिळणार नाही हे स्पष्ट केले. शिक्षण घेताना आपले आदर्श हे आपले आईवडिल, गुरुजन किंवा महान व्यक्तिमत्वच असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कॉलेज जीवनापासुन आपली स्पर्धापरिक्षेची तयारी केल्यास भविष्यात चांगले यश मिळु शकते हे स्पष्ट केले. सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर यामुळे विदयार्थी आपल्या ध्येयापासुन बाजुला जात आहे. त्यामुळे गुणवत्ता असुनदेखील हुशार विदयार्थी मागे पडतात. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर कसा करावा हे देखील त्यानी सांगितले. स्पर्धा परिक्षा देताना सुरुवातीला अपयश येवु शकते परंतु त्यावर मात करून प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळु शकते हे सांगितले. तसेच एमपीएससी आणि युपीएससी यातील फरक स्पष्ट करून त्यातील कोणत्या परिक्षावर लक्ष केंद्रित करावे याची माहिती दिली. मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांनी विदयाख्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क. मृणाली देर्देकर हिने तर समारोप कोमल झिंबर हिने केला. या कार्यक्रमाला पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, प्राचार्य पी. ए. देसाई, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एस. एस. खोत, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. पी. टी. सनये, पी. एस. भागवत, महाविदयालयाचा जी. एस. कु. प्रणव टाणकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSeminar in Patpnhale Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.