रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार एकदिवसीय चर्चासत्र
रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी द्वारे आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या सहयोगाने दि. १७ जानेवारी २०२६ रोजी “कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान” या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. Seminar at Sanskrit Sub-Center in Ratnagiri
या चर्चासत्रात कोकणातील विविध विद्वानांनी कशारितीने संस्कृत भाषेत आणि साहित्यात आपले योगदान दिले. यावर विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रामुख्याने उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील प्रा. दिनेश रसाळ उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्राच्या माध्यमातून कोकणातील विद्वानांची संस्कृत साहित्यातील भूमिका व योगदान यावर प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच याद्वारे उपस्थितांना कोकणातील संस्कृत साहित्यिक व विद्वान यांच्या कार्याचा सूक्ष्म शोध घेण्याची संशोधनात्मक दृष्टी विकसित होण्यास सहाय्य प्राप्त होणार आहे. Seminar at Sanskrit Sub-Center in Ratnagiri

या चर्चासत्रातील सहभाग हा नि:शुल्क असणार आहे. दुपारी भोजन व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे चर्चासत्रातील सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या चर्चासत्रात रत्नागिरीतील शिक्षक, शोधछात्र, विद्यार्थी आणि संस्कृतप्रेमी नागरिक यांनी आवर्जून नोंदणी करावी आणि उपस्थित रहावे. या चर्चासत्रातील सर्व सत्रे मराठी माध्यमातून होणार आहेत. तरी इच्छुकांनी प्रा. अविनाश चव्हाण – 8390854926, स्वरूप काणे – 7219054097 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी. Seminar at Sanskrit Sub-Center in Ratnagiri