जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच
गुहागर, ता.02 : शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आणि ग्रामपंचायत उमराठच्या सौजन्याने बुधवार दि. १ जून २०२२ रोजी ग्रामदेवता श्री नवलाई देवी मंदिराच्या प्रांगणात सुधारीत शेती पद्धती व नवीन संकरीत बी-बियांणे संदर्भात भातशेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हेदवी पंचक्रोशी कृषी विभागाचे पर्यवेक्षक संजय सानप, कृषी सेवक सतिश सपकाळ, यंत्र सामुग्री मार्गदर्शक अभिनव निंगडे आणि ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होत्या. Selection of Umrath Paddy Farming

यावेळी सुरुवातीलाच सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांचे स्वागत करून प्रस्तावनेत शेतकरी बांधवांना भातशेती कार्यशाळेचे महत्त्व व उद्देश सांगून शेतकर्यांनी फळझाडे लागवड आणि शेती लागवड करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरून यांत्रिकीकरण आणि कृषी विभागाच्या सुधारीत संकरीत बियाणांचा वापर करावा असेही सांगितले. Selection of Umrath Paddy Farming
सदर कार्यशाळेच्या वेळी मार्गदर्शन करताना सुरूवातीलाच कृषी पर्यवेक्षक संजय सानप यांनी मौजे उमराठ गावाची भातशेती कार्यशाळेसाठी निवड वर्षेभर केल्याचे जाहीर केले. Selection of Umrath Paddy Farming

यामध्ये पेरणी पूर्वी जूने बियांने सुरक्षित आहे का ते तपासून पाहणे. त्यानंतर मशागत किंवा विनामशागत जागेत सराहीत पद्धतीने पेरणी करणे किंवा वाफा पद्धतीचा अवलंब करून रोपवाटिका तयार करणे. वाढणाऱ्या रोपांची निगा राखणे, आवश्यकता भासल्यास किटकनाशक औषधांची फवारणी करणे, वाफ्यांतील तण काढणे, पिक तयार झाल्यावर योग्य वेळी. कापणी करणे आणि शेवटी मळणी काढणे इत्यादी बाबींचे मार्गदर्शन वेळोवेळी टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. Selection of Umrath Paddy Farming

सदर भात शेतीशाळा प्रशिक्षणाचा पहिला वर्ग घेण्यात आला असून यामध्ये भात बियाण्यास ३% मीठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करून बियाणे सुरक्षित आहे की नाही याची खात्री करून घेण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रत्यक्षिक करून दाखवण्यात आली. फळबाग लागवड आणि कृषी यांत्रिकीकरण, याविषयी प्रत्यक्ष वेगवेगळ्या कंपनींचे यंत्रे दाखवून त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्या नंतर प्रत्यक्ष शेतात जाऊन टोकन पद्धतीने भात लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. Selection of Umrath Paddy Farming

सदर प्रशिक्षण कार्यशाळेसाठी मौजे उमराठचे ग्रामस्थ शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित इच्छुक शेतकऱ्यांना नाचणी आणि संकरीत भात बियाणांचे वाटप करण्यात आले. बहुसंख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ उमराठच्या शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात घेतला. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या कु. प्रज्ञा पवार, सहाय्यक नितीन गावणंग, ग्रामरोजगार सेवक प्रशांत कदम आणि ग्रामस्थ महेश गोरिवले यांनी बहुमोलाचे सहकार्य दिले. शेवटी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सर्व उपस्थितांचे सदर कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून समारोप केला. Selection of Umrath Paddy Farming
