गुहागर, ता. 01 : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील 13 युवा खेळाडूंनी यंदा खेळाच्या मैदानात जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपला ठसा उमटवला आहे. या सर्व खेळाडूंची आगामी २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५’ मध्ये सहभागासाठी निवड करण्यात आली आहे. ४ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५’ या खेळाच्या मैदानात कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. Selection of players from Mandki-Palvan College

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी तब्बल आठ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स आणि बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे.या महोत्सवात चमकण्यासाठी सज्ज झालेल्या १3 खेळाडूंमध्ये आदित्य पाटील, शुभम कोळेकर, यश माने, यदनेश वामणे, देवराज पवार, गोठणकर प्रज्ञा, सोनल शिंदे, अमोल कोळेकर, वैष्णवी माने, ओंकार पाटील, प्रणव पाटील, आकाश वाडिया आणि आदित्य तांबेकर यांचा समावेश आहे. Selection of players from Mandki-Palvan College
या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मार्गदर्शक म्हणून मोलाचा वाटा हा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री बाळासाहेब सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक प्राध्यापक ज्ञानोबा बोकडे यांच्यासह संपूर्ण महाविद्यालयाने या युवा शिलेदारांचे अभिनंदन केले असून, त्यांनी आपल्या सर्वोत्तम खेळाच्या जोरावर महाविद्यालयाचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. Selection of players from Mandki-Palvan College
