गुहागर, ता. 01 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेस जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट देण्याचा जिल्हा वार्षिक योजनाअंर्गत उपक्रमशिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी नासा – इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अतिम निवड यादी जाहीर झाली आहे. जिल्हा परिषद शाळास्तरावर २५१ केंद्रांवर २० हजार ५११ विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. त्यातून एकूण ५५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यातील २० मुले नासासाठी निवडली गेली आहेत. Selection of 5 students from Guhagar for NASA, ISRO
यामध्ये गुहागर शहरातील सोहम समीर बावधनकर जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १, आयुष विनायक गुरव शाळा पिंपर नं. १ इयत्ता ६ वी व अनुश्री चंद्रकात गिझे शाळा शीर नं. १ इयत्ता ७ वी इस्त्रो भेटीसाठी पात्र झाले आहेत. तर विराज विष्णू नाचरे शाळा पाभरे व पुर्वा उमेश जाधव शाळा कौंढर काळसूर ७ वी हे विद्यार्थी नासा व इस्त्रो भेटीसाठी पात्र झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग व लायन्स क्लब गुहागरतर्फे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. Selection of 5 students from Guhagar for NASA, ISRO
जिल्हा परिषदेमार्फत यावर्षीही जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे सफर घडवण्यात येणार आहे. नासा व इस्त्रो या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळास्तरावर २५१ केंद्रांवर २० हजार ५११ विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. त्यातून एकूण ५५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यातील २० मुले नासासाठी निवडली गेली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पूजार यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीप्रमाणे यावर्षीही नासा व इस्त्रो या विज्ञान संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांना भेटी घडवण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. Selection of 5 students from Guhagar for NASA, ISRO