गुहागर, ता. 25 : येथील जय परशुराम क्रीडानगरी येथे गुहागर बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुहागर, पाटपन्हाळे, अंजनवेल आणि साखरी बुद्रुक अशा चार केंद्रातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, लंगडी व वैयक्तिक क्रीडा प्रकार खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन गुहागर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी गुहागर बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र वळवी हे होते. School sports competition

गुहागर केंद्रात बीटाच्या स्पर्धा जवळपास दहा वर्षानंतर होत आहेत. आणि याच्या यशस्वीतेसाठी गुहागर वासीयांनी एकजुटीने सहकार्य केले. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावरती निवड होणार आहे. त्यामध्ये कबड्डी मोठा गट मुलगे मुली, छोटा गट मुलगे मुली, खो-खो मोठा गट मुलगे मुली, छोटा गट मुलगे मुली, लंगडी मोठा गट व छोटा गट मुली, क्रिकेट मोठा गट मुलगे व वैयक्तिक – धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळी फेक, गोळा फेक इत्यादी क्रीडा प्रकार आहेत. School sports competition

या स्पर्धात चांगले क्रीडा नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड होणार आहे. सर्व सांघिक क्रीडा प्रकारात तालुकास्तरावर जाणारे संघ हे गुहागर, पाटपन्हाळे, साखरी बुद्रुक व अंजनवेल या चार केंद्रातील खेळाडूंचे असतील. तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिला आणि दुसरा अशा विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनात केंद्रप्रमुख ईश्वर वाचावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर केंद्रातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. School sports competition
