गुहागर, ता. 23 : तालुक्यातील आबलोली नं. 1 शाळेचा पहिला दिवस व इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेला फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. School “Entrance Festival” at Aabloli School

यावेळी सामाजिक आपुलकी आणि विद्यार्थी प्रति प्रेम असणारे श्री राजेश जी भोजने आयकर विभाग मुंबई यांच्या सौजन्याने श्रीम. गीता रविचंद्रन प्रधान आयकर आयुक्त मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मासू गावचे सुपुत्र श्री राजेश मासवकर व त्यांच्या सहचरणी संगीता मासवकर यांचे कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप करण्यात आले. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘पहिले पाऊल’ अभ्यासक्रमांतर्गत पायाचे ठसे घेऊन ते पालकांना आठवण म्हणून देण्यात आले. जेवणात विद्यार्थ्यांना गोड म्हणून शिरा देण्यात आला. योगिता रविकांत वाकडे यांचे कडून विद्यार्थ्यांना लाडू तसेच योगेश भोसले यांचे कडून विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले. School “Entrance Festival” at Aabloli School

वरील कार्यक्रमासाठी निर्मल ग्रामपंचायत आबलोली सरपंच सौ वैष्णवी वैभव नेटके, शा. व्य. समिती अध्यक्ष विक्रांत पागडे, स्थानिक प्रतिनिधी ऋषिकेश बाईत, माजी सभापती सौ. पूर्वी निमूणकर, स्नेहा विचारे, वैद्य, समीक्षा पवार, संचिता पवार व सर्व पालक उपस्थित होते. School “Entrance Festival” at Aabloli School