गुहागर, दि. 05 : कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिराचे आबलोली येथे आयोजन करण्यात आले. गुहागर तालुक्यातील इयत्ता पाचवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. Scholarship Mentoring Camp


पंचायत समिती सभापती सौ. पूर्वी निमुणकर, जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, पंचायत समिती उपसभापती श्री. सिताराम ठोंबरे, गुहागर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख तथा चंद्रकला फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सचिन बाईत, पंचायत समिती सदस्य श्री. रवींद्र आंबेकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मुकुंद कासारे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष कांबळे, जिल्हा सचिव श्री.संतोष मोहिते, कोषाध्यक्ष श्री. संतोष पडवणकर तालुकाध्यक्ष श्री. सुहास गायकवाड, माजी अध्यक्ष श्री.सिद्धार्थ जाधव मार्गदर्शक श्री.राजेश पालकर श्री. केतन ब्रीद, केंद्रप्रमुख श्री. नामदेव लोहकरे, श्री.रविंद्र कुळे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. दिपक साबळे, श्री.अमोल धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. Scholarship Mentoring Camp
यावेळी संघटनेतर्फे उपस्थित मान्यवरांना शिवचरित्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांना कॉन्फरन्स पॅड व गणिती सूत्रांची पुस्तिका भेट देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविका मधून संघटनेने आजवर केलेले कार्य व या मार्गदर्शन शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. पंचायत समिती गुहागरचे सन्माननीय पदाधिकारी व अधिकारी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्याचा ध्यास बाळगला आहे. याला हातभार लावण्याच्या उद्देशाने संघटनेतर्फे हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. Scholarship Mentoring Camp
जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी कास्ट्राईब संघटना ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी झटणारी संघटना आहे. शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना ही महापुरुषांची विचारधारा पुढे नेणारी असून शिक्षकांसाठी प्रतिवर्षी पुरस्कारही दिला जात असल्याचे सांगितले. गुहागर तालुका शिवसेनाप्रमुख श्री. सचिन बाईत यांनी कास्ट्राईब संघटनेच्या वतीने नेहमीच महापुरुषांच्या जयंती व स्मृतीदिनानिमित्ताने जीवन ग्रंथांचे वाटप तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी यांना केले जाते. Scholarship Mentoring Camp
उपसभापती श्री. सिताराम ठोंबरे यांनीही यावेळी संघटनेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला व या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष कांबळे यांनी संघटनेने वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ घेणे, शिष्यवृत्तीची रक्कम वाढविणे यासाठी संघटनेने मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न केले असल्याचेही सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या सन्मानीय मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी महोदयांनी गुणवत्तेसाठी जे विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे, याला संघटना सर्वतोपरी सहकार्य करेल असे यावेळी नमूद केले. Scholarship Mentoring Camp
या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी श्री. अमोल भोसले, गटशिक्षणाधिकारी श्री. वामन जगदाळे, विस्तार अधिकारी सौ. लीना भागवत ,श्री. चिंतामणी गायकवाड, श्री. मुकुंद कासारे यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, कोषाध्यक्ष सुहास जाधव, सचिव प्रकाश गोरे, सहसचिव वैभवकुमार पवार, सल्लागार अमोल होवाळे, प्रदीप जाधव, संदेश सावंत, गणेश वायचाळ, आशिष गायकवाड, गौतम लोणारे, संदीप खंडगावकर, मंगेश कारंडे, अंकुर मोहिते, ज्ञानेश्वर कोकाटे, प्रफुल्ल गायकवाड, रवींद्र राठोड, दीपक चव्हाण, प्रजाग मेश्राम यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष गायकवाड यांनी केले तर आभार वैभवकुमार पवार यांनी मानले. Scholarship Mentoring Camp

