• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नवउद्योजकांनी योजनांचा लाभ घ्यावा- विद्या कुलकर्णी

by Guhagar News
June 29, 2022
in Ratnagiri
16 0
0
Schemes for Entrepreneurs
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सीए इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रम

रत्नागिरी, ता. 29 : राज्य शासनाने नवउद्योजकांसाठी नवनवीन योजना लागू केल्या आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरिता विविध योजना आहेत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला पाहिजे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि कर्ज घेताना, जागा खरेदी, विज, यामध्ये भरघोस अनुदान, सवलत देण्यात येते. एससी, एसटी आणि महिलांसाठीही जास्त टक्के सवलत दिली जाते. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले आहे. Schemes for Entrepreneurs

जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मथुरा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष प्रसाद आचरेकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, प्रथमच जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्योजक होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती व लागणारे सर्व सहकार्य करू, असे सांगितले.  Schemes for Entrepreneurs

Schemes for Entrepreneurs

विद्या कुलकर्णी म्हणाल्या, सीएंनीसुद्धा आपापल्या ग्राहकांना याची माहिती द्यावी. याच्या जिल्हा समितीमध्येही सीएंच्या दोन प्रतिनिधींनी सहभाग घ्यावा. कर्जासाठी बॅंकेला लागणारा प्रस्ताव बनवून द्यावा. उद्योजकांसाठीच्या या योजनांची लोकांमध्ये जागृती करावी लागेल. त्यासाठी जास्तीत जास्त माहिती दिली पाहिजे. सूक्ष्म लघु, मध्यम उद्योग 2006 च्या कायद्यानुसार योजना आहे. २०२० मध्ये या योजनांमध्ये सुधारणा व काही बदल करण्यात आले आहेत. जागा खरेदीसाठी पैसे दिले जातात आणि खरेदीखताच्या नोंदणी खर्चात सवलत मिळते. प्रकल्प व यंत्रसामग्रीसाठी योजना आहे. वीजबिलासाठी 50 पैसे युनिटचे पैसे परत मिळतात. इलेक्ट्रॉनिक्स ड्युटी, सबसिडी, टर्म लोन दुसऱ्या वर्षी दिले जाते. राज्य सरकारचा जीएसटीमध्ये 25 टक्के पैसे दिले जातात. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी साठवणूक याकरिता अनुदान दिले जाते. Schemes for Entrepreneurs

Schemes for Entrepreneurs

इन्स्टिट्यूटच्या शाखेचे खजिनदार सीए केदार करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. विकासा चेअरमन सीए सौ. अभिलाषा मुळ्ये यांनी कुलकर्णी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी सदस्य सीए शैलेश हळबे यांच्यासह रत्नागिरीतील सीए उपस्थित होते. Schemes for Entrepreneurs

Tags: CA InstituteGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSchemes for Entrepreneursटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.