लोकाभिमुख अधिकाऱ्यांचा लांजा राजापूर वृत्ताच्यावतीने गौरव
गुहागर, ता. 16 : सध्या गुहागर येथे कार्यरत असणाऱ्या गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच राजापूर येथे “सावित्रीची लेक गौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तहसीलदार सौ. वराळे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन लांजा राजापूर वृत्ताच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. Savitri’s Lake Award to Varale


राजापूर तहसीलदारपदी चार वर्षे कार्यरत असणाऱ्या तहसीलदार सौ. वराळे या सध्या गुहागर तहसीलदार पदी काम करत आहेत. तहसीलदार म्हणून काम करताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. तर कायमच सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या कामाचा झटपट निपटारा करण्यावर त्यांनी भर दिला. समाजातील विविध घटकांशी त्यांनी अत्यंत चांगले संबध ठेवताना प्रशासकिय कारभार लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. कोरोनासारख्या महामारीत तसेच विविध आंदोलने व नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी अतिशय कौतुकास्पद काम केले. सर्वसामान्यांशी नाळ जुळलेल्या एक संवेदनशील अधिकारी व लोकाभिमुख काम करणाऱ्या लांजा राजापूर वृत्ताच्यावतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. Savitri’s Lake Award to Varale


गुहागर तालुक्यातही तहसीलदार म्हणून काम करताना त्यांनी प्राधान्याने सर्वसामान्य जनता हाच केंद्र बिंदू ठेऊन आपले काम सुरू केले आहे. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या पाहिजेत यासाठी त्या कायमच प्रयत्नशील रहात आहेत. जनतेच्या कामाचा झटपट निपटारा करतानाच प्रत्यक्षात योजनांची माहिती थेट जनतेत जाऊन देण्यावर त्यांचा भर असतो. एकूणच त्यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. Savitri’s Lake Award to Varale