महापुरुषची प्रशासनाला, शहरवासीयांना हाक
गुहागर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकमेव असलेले मैदान केवळ खेळासाठी सुरक्षित (save ground) करावे. या मैदानावर वाहने उभी करु नयेत. तसेच खाऊगल्लीचे स्वरूप देऊ नये. अशी मागणी महापुरुष क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हे मैदान वाचविण्यासाठी गुहागरकरांबरोबरच तालुकावासीयांनीही महापुरुष क्रीडा मंडळाला मदत करावी. असे आवाहन महापुरुषांच्या खेळाडूंनी केले आहे.(Save ground)
गुहागर शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या मागे मोठे मैदान आहे. दरवर्षी 26 जानेवारीला शहरातील सर्व शाळांच्या कवायती आणि पोलीसांची परेड या मैदानात होते. वर्षभर क्रिकेट, कबड्डी खेळले जाते. नित्यनेमाने तंदुरुस्तीसाठी क्रिकेट खेळणारे काही ग्रुपही आहेत. यामध्ये पोलीस, डॉक्टर, अन्य अधिकारी, कर्मचारी, आदींचा समावेश आहे. स्थानिक शाळकरी मुले शाळा सुटल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी खेळायला (sports ground) याच मैदानात येतात. शहर आणि तालुक्यातील क्रीडा संस्था इथे तालुका, जिल्हा स्तरीय स्पर्धा भरवतात. 10 दहा वर्षांपूर्वी खो खो ची राज्यस्तरीय स्पर्धा याच मैदानात झाली होती. (Save Ground)
या मैदानात अनेक नैमित्तिक सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये शासनाचा पर्यटन महोत्सव, नमन महोत्सव, विविध मराठी वाहिन्यांवरील मालिकांचे प्रमोशन, त्यानिमित्ताने घेतलेल्या महिलांच्या स्पर्धा, शासनाचे संस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे.
असे हे गुहागर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले मैदान आज मात्र पर्यटकांसाठी गाड्या (touris vehicles) लावण्याचे ठिकाण parking ground झाले आहे. याशिवाय बंदर विभागाने सुरू बनातील दुकानदारांवर कारवाई केल्यानंतर या दुकानदारांनी आपली दुकाने याच मैदानाच्या बाजूला थाटली आहेत. त्यामुळे शनिवार रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशी या मैदानाला जत्रेचे रूप येते. खेळाडूंना खेळायला मैदानच उरत नाही. यामुळे गुहागर शहर आणि तालुक्यातील क्रीडा रसिक नाराज आहेत.(Save Ground)
महापुरुष करते मैदानाची देखभाल
याच मैदानावर क्रिकेट cricket खेळणाऱ्या काही मंडळींनी एकत्र येत वीस वर्षांपूर्वी महापुरुष क्रिकेट मंडळाची स्थापना केली. दरवर्षी दिवाळीची पहिली आंघोळ झाल्यावर पोलीस परेड मैदानात (police pared ground) येऊन क्रिकेटचा सामना खेळायचा अशी परंपरा सुरू केली. या मैदानामध्ये महापुरुष क्रीडा मंडळातर्फे त्याचप्रमाणे अन्य क्रीडा मंडळे ही क्रिकेट आणि कबड्डीच्या स्पर्धा (competition) भरवतात.
हे मैदान खेळासाठी सुरक्षित राहावे यासाठी महापुरुष मंडळाने दरवर्षी साफसफाई करून या मैदानावरील एका बाजूला असलेली बोरीची झुडपे, अन्य रान हे दूर करते. मैदानाच्या कडेला असलेला कचरा, काचेच्या बाटल्या आदी कचरा उचलतात. सर्वांना खेळण्यासाठी हे खेळाडू क्रिकेटचे पीच बांधतात. एका अर्थाने या मैदानाची निगा राखण्याचे काम महापुरुष मंडळाचे खेळाडू सातत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता करत असतात.(Save Ground)
Save Ground
आज या मैदानाची स्थिती बघून महापुरुष मंडळातील खेळाडूंना अत्यंत दुःख होत आहे. हे मैदान वाचावे यासाठी महापुरुष क्रीडा मंडळाने नगरपंचायत गुहागर, तहसीलदार गुहागर यांना पत्रे लिहिली आहेत. मात्र या मागणीकडे प्रशासन याकडून फारसे लक्ष दिले जात नाही. अशी खंत महापुरुष मंडळाने व्यक्त केली आहे.
महापुरुष मंडळाचे अध्यक्ष संतोष तथा बाबु गुहागरकर, कल्पेश बागकर, प्रवीण रहाटे, मयुरेश कचरेकर, हर्षल बावधनकर, अभिजीत गोळे, पराग सावंत या सर्वांनी गुहागर न्यूजशी बोलताना सांगितले की, पोलीस परेड मैदान सुरक्षित राहावे यासाठी आम्ही क्रीडांगण वाचवा अभियान हाती घेणार आहोत. आमचा खाऊ गल्लीतील व्यावसायिकांना विरोध नाही. मात्र व्यवसायासाठी साडे सात किमीच्या समुद्र किनाऱ्यावर अन्य ठिकाणी जागा मिळू शकतात. पण मैदान मिळणार नाही. त्यामुळे या व्यवसायिकांनी हे मैदान मोकळे करावे. गुहागर नगरपंचायतीने अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वाहने उभी करण्यासाठी पर्यायी जागा शोधावी. केवळ पर्यटकांची नव्हेत तर अन्य वेळी लागणारी शासकीय, निमशासकीय, खासगी वाहनेही तेथे लागू नयेत. अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. तरच गुहागरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले क्रीडांगण सुरक्षित राहील. त्यातून गुहागर शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील क्रीडा संस्कृती बहरेल.
क्रीडा संस्कृती टिकावी. वृद्धिंगत व्हावी. या हेतूने आम्ही मैदान वाचवा हे अभियान हाती घेणार आहोत. मात्र इथल्या शासकीय यंत्रणांनी हे अभियान सुरूच होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. अशी आमची कळकळीची विनंती आहे.