• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ खुर्द आंबेकरवाडीत महापुजा संपन्न

by Guhagar News
May 12, 2022
in Guhagar
16 1
0
Satyanarayana's Mahapuja held in Umrath
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे रविवार दि. 08/05/2022 रोजी श्री देव भराडा मंदिरात वार्षिक सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. 105 व्या महापुजेचे वेळी गुणगौरव जेष्ठ ग्रामस्थांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम  आयोजन करण्यात आले होते. Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

आंबेकरवाडीतील पहिली सार्वजनिक श्री सत्यनारायण महापुजेचा 1918 मध्ये सुरू झाली. त्या वेळेच्या ग्रामस्थांमध्ये असलेले ताडी-माडी, दारू अशा प्रकारच्या नशा प्राशन करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला आळा बसावा या उद्देशाने नशाबंदीची शपथ घेऊन सार्वजनिक हितासाठी श्री सत्यनारायणाच्या पुजेचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१७ मध्ये या सामुहिक पुजेला १०० वर्षे पुर्ण झाली. शतक महोत्सवी वर्ष म्हणून दोन दिवस विविध शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले होते. Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

Satyanarayana's Mahapuja held in Umrath

या वर्षी आंबेकरवाडीतील १०५ व्या  सार्वजनिक श्री सत्यनारायण पुजेच्या वेळी आंबेकरवाडी प्रतिष्ठानच्यावतीने पहिली ते पदवीधर, तांत्रिक  व अन्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच राज्यस्तरीय निंबध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी कु. समृद्धी सुरेश आंबेकर, या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

पुजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत आंबेकरवाडीचे पारंपारिक संगीत नमन(खेळे) सादर करण्यात आले.  ही पारंपारीक कला गोविंद गोपाळ आंबेकर, कै. भागोजी रामा आंबेकर, भिकू रामा आंबेकर, महादेव देवजी आंबेकर आणि सहकारी यांनी जपली. ही कला स्थानिक आणि मुंबईकर तरूण मंडळी पुढे चालवत आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही  सहभाग होता. Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

Satyanarayana's Mahapuja held in Umrath

यावेळी उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील ६० वर्षे पुर्ण केलेल्या ४० ग्रामस्थांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध निवडून आलेले जनार्दन पांडुरंग आंबेकर, शशिकांत सिताराम आंबेकर आणि सौ. अर्पिता अनंत गावणंग तसेच पोलीस पाटील वासंती आंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव देवजी आंबेकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सरपंच जनार्दन आंबेकर म्हणाले की,  हा फक्त माझा सन्मान नाही उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि उमराठ बुद्रुक या दोन्ही महसुली गावांतील ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझी बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली. त्यामुळे हा  सन्मान ग्रामस्थांचा आहे. शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचवून त्या कार्यान्वित करून घेण्याचे काम ग्रामपंचायत  करत आहे. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

या संपूर्ण कार्यक्रमाला उमराठ खुर्दची पोलीस पाटील कु. वासंती पांडुरंग आंबेकर हिने अतिशय उत्कृष्टपणे सुमधूर गोड आवाजात पार्श्वसंगीताने साथ दिली. तिला हार्मोनियमवादक कु. चैतन्य धोंडू गावणंग व ढोलकीवादक कु. सारंग कृष्णा गावणंग तर कोरस म्हणून प्रिती गोविंद आंबेकर व शशिकांत पोस्कर, विलास आंबेकर, इत्यादी तरूणांनी उत्तम साथ दिली. नेपथ्य करण्यात सौ. राधा मुकूंद आंबेकर हिचेही मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व सहभागी लहान-थोर यशस्वी कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

सदर कार्यक्रमाला उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, पोलीस पाटील कु. वासंती पांडुरंग आंबेकर, उमराठच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, ग्रामसेवक अनंत गावणंग, उमराठचे ग्रामस्थ प्रकाश पवार, उदय पवार, नामदेव पवार, शांताराम गोरिवले, गोविंद धनावडे, पत्रकार सुरेश आंबेकर इत्यादी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. तर प्रतिष्ठानचे मुंबईचे अध्यक्ष लक्ष्मण आंबेकर, सरचिटणीस मंगेश आंबेकर, चिटणीस विनायक रांगले, सहचिटणीस शशिकांत. पोस्कर, माजी खजिनदार मनोहर आंबेकर, विष्णू आंबेकर तर स्थानिक अध्यक्ष महादेव आंबेकर, चिटणीस मोहन आंबेकर, खजिनदार अशोक पोस्कर, सल्लागार गंगाराम गावणंग, धोंडू आंबेकर, गणपत आंबेकर, वसंत आंबेकर, पोस्ट मास्तर दिलीप आंबेकर, दत्ता आंबेकर आणि बहुसंख्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चिटणीस विनायक रांगले यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेश आंबेकर यांनी केले. Satyanarayana’s Mahapuja held in Umrath

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSatyanarayana's Mahapuja held in Umrathटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.