गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वरवेली येथील अरुण उर्फ बावाशेठ विचारे यांच्या निवासस्थानी २१ दिवसीय गणेशोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त शक्ती तुर्याचा जंगी सामना रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वा. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय वरवेली फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे. Satyanarayan Puja on the occasion of Ganesh festival

नवसाला पावणार्या लालबागच्या राजाची मूर्ती विराजमान असून गेली तीन वर्षे २१ दिवस भक्तीभावाने पूजाअर्चा सुरू आहे. या गणरायाच्या ठिकाणी आरती, भजन, जाकडी नृत्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. यासाठी विचारे कुटुंबीय सेवा करत आहेत. शक्तीवाले शाहिर कु. आदित्य खाडेकर (बंड्यामारुती नृत्य कलापथक (अडूर भाटलेवाडी) विरुद्ध तुरेवाले शाहिर विनेश तांबे सह संजय बामणे (श्री सोनगाई देवी नृत्य कलापथक, काढर काळसुर तांबेवाडी, ता. गुहागर) यांचा सामना आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अरुण उर्फ बावाशेठ विचारे यांनी केले आहे. Satyanarayan Puja on the occasion of Ganesh festival