गुहागर, ता. 09 : खालचापाट जांगळेवाडी येथील श्री. नुतन गोपाळकृष्ण जांगळेवाडी ग्रामोन्नती सेवा संघ यांच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त गुरूवार दि. 12/05/2022 रोजी सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त 12 ते 14 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Satyanarayan Pooja in Guhagar Jangalwadi


या वर्षी खालचापाट जांगळेवाडी येथील श्री. नुतन गोपाळकृष्ण जांगळेवाडी ग्रामोन्नती सेवा संघ या संस्थेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गुरूवारी 12 मे रोजी सकाळी 8 वा. श्री.देव चव्हाटा जिर्णोध्दार, 8.30 वा. श्री. सत्यनारायण पुजा व आरती, 2 ते 5 वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 6 नंतर स्थानिक भजनांचा कार्यक्रम आहे. यामध्ये श्री. नुतन गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ खालचापाट जांगळेवाडी, श्री. भैरीव्याघ्रांबरी प्रासादिक भजन मंडळ, असगोली हुंबरवाडी, नुतन नेश्वर प्रासादिक भजन मंडळ किर्तनवाडी गावडे विभाग, श्री. किर्तने प्रासादिक भजन मंडळ किर्तनवाडी भागडे विभाग, श्री. महापुरूष प्रासादिक भजन मंडळ , दुर्गादेवीवाडी, ही भजन मंडळे सहभागी होणार आहेत. Satyanarayan Pooja in Guhagar Jangalwadi
खालचापाट जांगळेवाडी येथील श्री. नुतन गोपाळकृष्ण जांगळेवाडी ग्रामोन्नती सेवा संघाने अमृत महोत्सवानिमित्त स्मरणिका तयार केली आहे. गुरूवारी 12 मे रोजी सायंकाळी 8.30 वा. स्मरणिका प्रकाशन सोहळा आहे. रात्रौ 10 वा. तिरंगी भजन माला होणार आहे. यामध्ये श्री. वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ, शिवणे, श्री. जांभळादेवी प्रासादिक भजन मंडळ, गुहागर बाग, श्री. विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, वेलदूर यांचा समावेश आहे. Satyanarayan Pooja in Guhagar Jangalwadi


शुक्रवार 13 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सन 2017 ते 2022 वर्षामधील यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, नवउद्योजकांचा सत्कार सोहळा, वयोवृध्दांचा सन्मान सोहळा, रात्रौ 10 वा. श्री सह्यांद्री मार्लेश्वर कलामंच पाटगांव यांचे बहूरंगी नमन असा कार्यक्रम आहे. तर शनिवार 14 मे रोजी रात्रौ 10 वा. सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. Satyanarayan Pooja in Guhagar Jangalwadi
या महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नुतन गोपाळकृष्ण जांगळेवाडी ग्रामोन्नती सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. Satyanarayan Pooja in Guhagar Jangalwadi