पुरुषांनाही समान संधी, सरपंच आरक्षण सोडत जाहीर
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील एकूण ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवार दि. १४ जुलै रोजी गुहागर भंडारी भवन येथे तहसिलदार परिक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती असून ३३ ग्रामपंचायतींवर महिला राज असून पुरुषांनाही त्याबरोबरीने संधी देण्यात आली आहे. Sarpanch reservation announced


या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात शिवणेमध्ये महिला राखीव तर जांभारीमध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये शीर, मासू, पाचेरीसडा, भातगाव, साखरीत्रिशूळ, मुंढर, कारुळ, विसापूर, मळण यांवर महिला ना.म.प्र. व पाचेरीआगर येथे वडद, कोतळूक, विसापूर, काजुर्ली, गोळेवाडी, असगोली, रानवी, आंबेरे, सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी प्रवर्ग – पिंपर, आवरे-असोरे, पाटपन्हाळे, सुरळ, उमराठ, पडवे, पालकोट त्रिशूळ, झोंबडी, वरवेली, कोळवली, पालशेत, खोडदे, वेळणेश्वर, पाली, पाभरे, खामशेत, पांगारीतर्फे हवेली, जामसूद, कुडली, नरवण, धोपावे, आरे, कोंडकारुळ तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आबलोली, जानवळे, चिंद्रावळे, काताळे, साखरीआगर, पेवे, पांगारीतर्फे वेळंब, अडूर, अंजनवेल, वेलदूर, कोसबीवाडी, तळवली, निगुंडळ, पालपेणे, गिमवी, हेदवी, कौंढरकाळसूर, मढाळ, चिखली, पोमेंडी, कुटगिरी, साखरी बुद्रुक यांचा समावेश आहे. Sarpanch reservation announced


दरम्यान, आरक्षण सोडत जाहीर होताच अनेकांनी गाव पातळीवर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष करुन महिलांना संधी मिळाल्याने अनेकजण इच्छुक आपल्या होम मिनिस्टरसाठी प्रयत्न करत आहेत तर जिथे महिला जागा आहेत तेथील अनेक पुरुषांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. त्यामुळे आतापासूनच गावांमध्ये राजकीय खेळी सुरु झालेल्या दिसून येत आहेत. Sarpanch reservation announced