योगेश पाटील, ग्रामविकासासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण
गुहागर, ता. 16 : ग्रामविकासाची दिशा ठरविणारा लोकनेता म्हणजे सरपंच. त्यांना शाश्वत विकासाचे यशस्वी प्रयोग दाखविल्यास, प्रेरणा दिल्यास गावे समृध्द होतील. त्यासाठी एमआयटी, राष्ट्रीय सरपंच संसद ही संस्था काम करते. या संस्थेद्वारे कोकण विभागाची पहिली सरपंच संसद जयगडला आयोजित करत आहोत. अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली. (Sarpanch Parliament to be held in Jaigad)
सरपंच संसदच्या नियोजनासाठी राष्ट्रीय सरपंच संसदचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश पाटील आले होते. या उपक्रमाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. योगेश पाटील म्हणाले की, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट (The MIT Group of Institutions) या शिक्षण समुहाची 38 वर्षांपूर्वी स्थापना झाली. 72 शैक्षणिक संस्थामध्ये प्रति वर्षी 70 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. 2005 मध्ये माजी निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटीचे संचालक राहुल कराड यांनी राजकारण येवू इच्छीणाऱ्या युवावर्गासाठी एमआयटी स्कुल ऑफ गर्व्हमेंट (MIT’s School of Government) या संस्थेची स्थापना केली. दरवर्षी देशातील निवडक 60 तरुणांना 2 वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय छात्र संसद या उपक्रमातून देशातील 10 हजार विद्यार्थ्याचे संघटन उभे केले आहे. (Sarpanch Parliament to be held in Jaigad)
राहुल कराड यांनीच 2017 मध्ये एमआयटीने राष्ट्रीय सरपंच संसद या अराजकीय उपक्रमाला सुरवात केली. देशातील 6 लाख खेड्यांचे नेतृत्व सरपंच करतात. त्यांच्या कर्तृत्वातून राष्ट्र निर्माणाचे काम होऊ शकते. गावाच्या विकासाची दिशा समजणारा हा लोकनेता आज दुर्लक्षित आहे. त्यांना सर्वांगिण ग्रामविकासाची दृष्टी देणे, प्रेरणा देणे. शाश्वत विकासाकडे गावाला नेणाऱ्या सरपंचांना व्यासपीठ देणे. असे ध्येय ठरवून ही संस्था महाराष्ट्र, गुजराथ, गोवा या राज्यात काम करत आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील काम सुरु केले आहे. 352 तालुके दत्तक घेवून या ठिकाणी शेतकरी उत्पादक संघ, माती परिक्षणावर आधारीत शेती, शुध्द पाणी, 1 डिजिटल शाळा, सौर उर्जेद्वारे ग्रामपंचायत इमारत व पथदिप, अभ्यास दौरे अशी कामे सुरु झाली आहेत. इस्राईल सरकार द्वारे तंत्रज्ञानावर आधारीत शेतीचे केंद्रे महाराष्ट्रात काही ठिकाणी सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Sarpanch Parliament to be held in Jaigad
कोरोना संकटानंतर राष्ट्रीय सरपंच संसदतर्फे प्रत्येक विभागात सरपंच संसद घेण्याचे आम्ही निश्चित केले. त्याप्रमाणे कोकण विभागाची पहिली संसद जयगडमध्ये जिंदालच्या सहकार्याने घेण्याचे आम्ही नियोजन करीत आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार सन्मानित पोपटराव पवार, राहीबाई पोखरे, परशुराम गंगावणे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रण देणार आहोत. कोकण विभागातील 1000 सरपंच यावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोकणात शाश्वत विकासासाठी काम केलेल्या सरपंचांचे अनुभवकथन होईल. Sarpanch Parliament to be held in Jaigad
इथेनॉल निर्मितीसाठी बांबु लागवड. विविध कंपन्याच्या सीएसआर फंड मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत., केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामविकास योजनांची माहिती. असे थेट ग्रामविकासाचे विषयांची चर्चा संसदेमध्ये होईल. अशी माहिती योगेश पाटील यांनी दिली. Sarpanch Parliament to be held in Jaigad
यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदचे राष्ट्रीय समन्वयक प्रकाश म्हाते, प्रांत समन्वयक संतोष राणे, नाशिक विभाग समन्वयक संजय भांबर उपस्थित होते. कोकण समन्वयक सुहास सातार्डेकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. Sarpanch Parliament to be held in Jaigad