• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना एमडीआरटी बहुमान

by Guhagar News
May 19, 2022
in Guhagar
17 0
0
Santosh Varnde Got MDRT Membership

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे

34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरंडे विमा सेवा केंद्राचा 13 वा सन्मान; चिपळूण शाखेत पहिले MDRT होण्याचा मान

गुहागर, ता. 18 :  येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी (LIC) संतोष वराडे यांनी सन 2022-23 या सालात चिपळूण शाखेत पाहिले एमडीआरटी होण्याचा मान प्राप्त केला आहे. अमेरिकेत होणाऱ्या एमडीआरटी कॉन्स्फरन्ससाठी ते पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Santosh Varnde  Got MDRT Membership

Cataract Screening camp at Guhagar

विमा प्रतिनिधी संतोष वराडे आणि पत्नी गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे हे दोघेही गुहागर वासियांना उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहेत. सुसज्ज कार्यालय, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, सेवा आणि तत्परता या त्यांच्या गुणांमुळे ते त्यांच्या विमेदारांच्या विश्वासाला नेहमीच पात्र ठरत आले आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहून हे दांपत्य गेले अनेक वर्ष एजंट म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी पत्नी स्नेहा वरंडे यांनी तीन वेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. तर संतोष वरंडे यांनी दहा वेळा असे वरंडे विमा सेवा केंद्राचा हा 13 वा सन्मान आहे. Santosh Varnde  Got MDRT Membership

या पुरस्काराबद्दल बोलताना श्री. वरंडे म्हणाले, आपण दिलेल्या उदंड सहकार्यामुळे आज मी माझे आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे व्यावसायिक १० वे MDRT पूर्ण करू शकलो. चिपळूण शाखेत पहिला MDRT होण्याचा मान मिळाल्यामुळे आधिक आनंद होत आहे. पुन्हा एकदा अमेरिकेला होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. सतत अधिकाधिक लोकांना भेटून उत्तम सेवा देताना विमा संरक्षणही वाढवून देण्यात यशस्वी झाल्याने हे शक्य झाले. Santosh Varnde  Got MDRT Membership

यासाठी मेहनत तर आहेच पण तुमचे सर्वांचे प्रेम आणि अखंड पाठिशी असलेला आशिर्वाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली. या यशात माझे कुटुंब, वरंडे विमा सेवा सर्व सहकारी, चिपळूण ब्रांचचे मॅनेजर साईनाथ मेस्त्री आणि सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच माझे विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, एजंट होमचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच माझा प्रिय विमेदार आणि माझा हितचिंतक मित्र परिवार यांच्या मुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. म्हणूनच त्यांचे आभार न मानता मी अखंड त्याचा ऋणी राहीन, असे त्यांनी सांगितले. पत्नी स्नेहा वरंडे यांनी काही महिन्यांपूर्वी सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर विभागात अवघ्या वीस दिवसात प्रथम एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त केला होता. Santosh Varnde  Got MDRT Membership

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.