गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुहागर भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस संतोष सांगळे यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पार्टी यांच्याकडून करण्यात आली. त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकृत नगरसेवक पदाचा अर्ज दाखल केला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी दिली. Santosh Sangle from BJP for approved corporator
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या निर्णयानुसार गुहागर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी संतोष सांगळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. संतोष सांगळे हे गुहागर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. गुहागर शहर विकास आघाडी निर्माण करण्यामागे त्यांचा मोठा मोलाचा वाटा होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाने त्यांच्यावर पक्ष विस्तारक म्हणून जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी देऊन चांगलं काम करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली आहे. दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या अधिकृत नावाची घोषणा पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष सौ नीता मालप करणार आहेत. Santosh Sangle from BJP for approved corporator

तरी भारतीय जनता पार्टी च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर शहर अध्यश नरेश पवार यांनी केले आहे. Santosh Sangle from BJP for approved corporator
