गुहागर, ता. 24 : खेळ, पाठांतर, गोष्ट सांगणे, गाणी म्हणणे, व्यायाम अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमधुन 5 ते 12 वयोगटातील 25 ते 30 मुलांना संस्कारीत करण्याचे काम गुहागरमधील सौ. सई अरुण ओक 3 वर्ष करीत आहे. खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील प्राध्यापिक सौ. मिरा महाजन नित्यनेमाने या संस्कार वर्गात उपस्थित राहून सौ. ओक यांना साह्यभूत होत आहेत. या संस्कार वर्गामुळे मुले आनंदी आणि निरोगी रहात असल्याचे पालक आवर्जुन सांगतात. Sanskar Varg For children


कोरोना लाटेचा कालखंड सोडला तर गेली 3 वर्ष सौ. सई ओक आपल्या घराच्या अंगणात संस्कार वर्ग घेत आहेत. या संस्कार वर्गात सुरवातीला सुर्यनमस्कार, त्यानंतर पकडापकडी, भस्मासुर, लंगडी आदी मैदानी खेळ मुले खेळतात. त्यानंतर गोल बसुन स्मरणशक्ती वाढवणारे खेळ घेतले जातात. खेळून झाल्यावर मुले पाच सहा श्लोकांचे पठण करतात. आठवड्यातून एकदा कविता म्हणणे, गोष्ट सांगणे, छोटासा निबंध वाचून दाखविणे, नवीन श्लोक पाठ करणे. महिन्यातून एकदा चालत सहल असे कार्यक्रम या संस्कार वर्गात घेतले जातात. आठवड्यातील सर्व कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होणाऱ्या मुलाला फुलझाडाचे रोप बक्षिस दिले जाते. गोष्टीचे पुस्तक वाचायला देवून त्यातील गोष्ट मुलांनी सांगायची असते. Sanskar Varg For children


या संस्कार वर्गाविषयी सौ. सई ओक म्हणाल्या की, माझी आई निवृत्तीनंतर झोपडपट्टीतील मुलांना शिकविण्यासाठी रोज जात असे. तेव्हाच आपण असे काहीतरी करावे असे ठरवले होते. 58 व्या वर्षी चैताली मेडिकलचा व्यवसाय मुले आणि सुनांकडे सोपवून आम्ही निवृत्ती घेतली. घरामध्ये नातवंडे होती. त्यांच्यासाठी काही गोष्टी करताना संस्कार वर्ग चालविण्याची कल्पना सुचली. अंगणातच मुलांना व्यायाम करता यावा म्हणून काही साहित्य आणले आणि संस्कार वर्ग सुरु केला. या वर्गासाठी आम्ही कोणतीही फि आकारत नाही. Sanskar Varg For children


Sanskar Varg For children
संस्कार वर्गामुळे मुलांचा हट्ट कमी झालाय. घरामध्ये मुले आनंदी असतात. आरोग्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. आकलनशक्ती वाढली आहे. शब्दोच्चार स्पष्ट झालेत. चांगले वाईट ओळखण्याची समज त्यांच्यात आली आहे. असे अनेक बदल मुलांमध्ये दिसून येत आहेत. आम्हाला माहिती नसलेले श्लोक मुले शिकली आहेत. विशेष म्हणजे आमच्या मोबाईलवर गेम खेळण्याचे, व्हिडिओ पहाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
– सौ. स्नेहा हेमंत बारटक्के, पालक
See our video also

