गुहागर, ता. 19 तालुक्यातील कोतळूक येथील संकेत शंकर गोताड याची सीमा सुरक्षा दला मध्ये (border security force) निवड होऊन तो राजस्थान जोधपूर येथे कार्यरत आहे. संकेत याची BSF मध्ये निवड झाल्याबद्दल कोतळूक ग्रामपंचायत वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. Sanket Gotad selected in Border Security Force


संकेत याने कोतळूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे आबलोली येथे हायस्कूल मध्ये १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वेळणेश्वर येथील इंजिनिअर कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर शिक्षण घेत असतानाच सैन्य दलात भरती होण्यासाठी सांगली येथे अॅकॅडमीत प्रवेश केला. जिद्द, चिकाटी ने आत्मविश्वासाने त्याने प्रयत्न सुरू केले. ३ वर्षापूर्वी त्याला सैन्य दलात भरती होण्यासाठी संधी निर्माण झाली परंतु दुर्दैवाने त्याला अपयश आले. अपयश आले तरी खचून न जाता मेहनत, जिद्द न सोडता संकेतने आपले अथक प्रयत्न सुरू ठेवले व त्याला यश येऊन त्याची BSF (border security force) मध्ये निवड होऊन राजस्थान जोधपूर येथे तो रूजू झाला आहे. Sanket Gotad selected in Border Security Force


सैन्य दलात भरती झाल्यानंतर तो पहिल्यांदाच कोतळूक गावात आल्याने त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याचे आई, बाबा, सरपंच सौ प्रगती मोहिते, उपसरपंच शितल गोरिवले, सदस्य सचिन ओक, सचिन भेकरे, सुनिल आगिवले, लक्ष्मण वरकर, समीक्षा वाघे, आसावरी बाधावटे, मनाली मोहित, ग्रामपंचायत अधिकारी कमलाकर शिरकर, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, पोलिस पाटील संचिता मोहिते, विनोद शिगवण, शमिका भेकरे, कोतळूक शाळा नं १ मुख्याध्यापक प्रताप देसले, वसंत गोरिवले, समीर ओक, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर, कोतळूक शाळा नं. १ सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. Sanket Gotad selected in Border Security Force