• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

 विरार येथे नाचला संकासूर

by Guhagar News
March 9, 2026
in Bharat
116 1
0
Sankasur in Virar
228
SHARES
651
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : विरार येथे गुरुकृपा सोसायटीतील रहिवासी व गुहागरवासी यांनी एकत्रित येऊन कोकणची पारंपरिक लोककला मोठ्या उत्साहात सादर करत सांस्कृतिक वारसा जपण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. कोकणातून उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतरित झालेल्या कोकणवासीयांनी एकत्र येत “कोकणचे खेळे” सादर करून उपस्थितांना शिमगोत्सवाचा आनंद दिला. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पारंपरिक वेशभूषा, ढोलकीच्या ठेक्यावर रंगणारे नृत्य, गाणी आणि धार्मिक विधींनी वातावरण भारावून गेले होते. गोमू आणि संकासूर ही प्रमुख आकर्षणे ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी देवाला गाऱ्हाणे घालून मंगलमय समारोप करण्यात आला. Sankasur in Virar

Sankasur in Virar

कोकणात साधारणपणे १५ ते २० दिवस चालणारी ही परंपरा विरारमध्ये एका दिवसात अनुभवायला मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. नोकरी-व्यवसायामुळे गावी शिमगोत्सवासाठी जाता न येणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम विशेष ठरला. विविध भागात वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांनी एकत्र येत आपली संस्कृती आणि परंपरा मुंबईसारख्या महानगरात जपत आहेत. Sankasur in Virar

या कार्यक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. नव्या पिढीला आपल्या मातीतल्या परंपरांची ओळख व्हावी, लोककलेबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि सांस्कृतिक एकात्मता वाढावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक जतन यांचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. Sankasur in Virar

दरम्यान, “देवखेळे” या वेबसिरीजमध्ये संकासुराचे क्रूर व खुनी स्वरूप दाखवण्यात आल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. पारंपरिक लोककलेतील संकासुर हा केवळ सोंग आणि धार्मिक परंपरेचा भाग असून त्याचे विकृत चित्रण थांबवावे व संबंधित वेबसिरीज तात्काळ बंद करावी, अशी मागणी कोकणच्या खेळ्यांकडून करण्यात आली. Sankasur in Virar

विरारमध्ये रंगलेल्या या कोकणी खेळ्यांनी सांस्कृतिक परंपरेचा जागर केला आणि स्थलांतरित समाजाला एकत्र आणत कोकणच्या मातीशी नाळ जिवंत ठेवण्याचा सुंदर प्रयत्न साकारला. Sankasur in Virar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsNews in GuhagarSankasur in Virarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.