गुहागर, ता. 18 : गुहागर तालुक्यातील विसापूरमध्ये रहाणाऱ्या राहुल रमाकांत भागवत यांचे अकाली निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. त्याच्या प्रश्र्चात पत्नी संगिता, 8 वर्षांचा मुलगा महेश, भाऊ, भावजय, पुतण्या आणि आई असा परिवार आहे. संघ कार्यकर्ता असलेला राहुल भागवतवर सध्या धर्मजागरण गतीविधीची तसेच अनुलोम मित्र म्हणून जबाबदारी होती. शृंगारतळी येथे कृषी अवजारे विक्री व दुरुस्ती असा व्यवसायही राहुल भागवत करत होते. 8 दिवसांपूर्वी मेंदुत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दुपारी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. Sangh activist Rahul Bhagwat is no more

गुहागर तालुक्यातील विसापूर येथे रहाणारे राहुल रमाकांत भागवत हे गणित या विषयात पारंगत होते. चिपळूणमधील डिबीजे महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर गणित या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी राहुल भागवत यांना होती. मात्र गावी राहून शेतीच करायची असा निर्धार करुन राहुल भागवत विसापूरला परतले. घरची शेती, बागायती याबरोबरच आंबा कॅनिंग, कृषी अवजारे विक्री आणि दुरूस्ती असे उद्योग राहुल भागवत करत होते. कनिष्ठ महाविद्यालयात असताना ते शाखेत जाऊ लागले. तेव्हापासून आजतागायत संघ शरणवृत्तीने संघ सांगेल ते काम ते जबाबदारी घेवून पूर्ण करत असतं. राम जन्मभुमी आंदोलन, गो ग्राम यात्रा, रामसेतू यात्रा, विशाल हिंदू संमेलन, श्रीराम मंदिर निधी संकलन आणि श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या सर्व अभियानांच्या यशस्वीतेसाठी तळवली पंचक्रोशीत त्यांनी मेहनत घेतली. गुहागर शहरात झालेल्या पहिल्या संघ शिबीरातील वीज विभागाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती. विसापूर गावातील प्रत्येक ग्रामस्थांशी व्यक्तीगत संपर्क हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. गावातील कोणाच्याही अडीअडचणीला राहुल भागवत तत्परतेने धावून जायचे. घरामध्ये जनसंघ, भाजपचा प्रभाव असला तरी त्यांच्या कामात कुठेही राजकारणाचा लवलेश नसे. अनुलोमच्या माध्यमातून त्यांनी गावात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. Sangh activist Rahul Bhagwat is no more
अत्यंत मेहनती, मितभाषी तरीही लोकसंग्रही अशा राहुल भागवत यांच्या नाकातून अचानक रक्त येवू लागले म्हणून बुधवारी (ता. 10) रात्री चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून गुरुवारी (ता. 11) सायंकाळी अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मेंदुत फुटलेल्या एका रक्तवाहीनीशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती. मात्र अचानक त्यांच्या मेंदुला होणाऱा रक्तपुरवठा रक्ताच्या गाठी झाल्याने थांबला आणि मेंदु क्रीयाहिन झाला. गेले दोन दिवस परमेश्वर चमत्कार करेल अशी आशा सर्वांना होती. मात्र दुर्दैवाने 18 सप्टेंबरला दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. Sangh activist Rahul Bhagwat is no more