मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन; ४ नोव्हेंबरला इंदिरा गांधी नाट्यगृहात
रत्नागिरी, ता. 01 : संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या गाजत असलेल्या आणि बहुचर्चित असलेलं संगीत देवबाभळी या नाटकाचा चिपळूणमधील शेवटचा व रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव प्रयोग ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे होणार आहे. नव्या पिढीसह ज्येष्ठांनी हा प्रयोग आवर्जून पाहावा, आपल्या मुलांना पालकांनी हे नाटक आवर्जून दाखवावे, असे आवाहन नाट्य संयोजक योगेश कुष्टे यांनी केले आहे. “Sangeet Deobabhali” drama experiment in Chiplun

मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन ठरलेले संगीत देवबाभळी हे नाटक असून प्रसाद कांबळी यांनी भद्रकाली प्रोडक्शनच्या माध्यमातून ते रंगमंचावर आणले आहे. ४४ सर्वाधिक पुरस्कार प्राप्त देवबाभळी हे नाटक नाशिकमधील प्राजक्त देशमुख यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे व लिहिले आहे. नाटकातील नेपथ्य, संगीत, गीते सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. या नाटकामध्ये मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मानसी जोशी व शुभांगी सदावर्ते या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे सध्या भरभरून कौतुक केले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी या नाटकाने प्रचंड गर्दी खेचली आहे. या नाटकातील अभिनय, संगीत, गीत, लेखन या साऱ्यांवरच कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. “Sangeet Deobabhali” drama experiment in Chiplun

मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन ठरलेली नाट्यकृती चिपळूणवासियांना ४ नोव्हेंबर रोजी पाहाण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. १ नोव्हेंबरपासून नाट्यगृहावर तिकीट विक्री सुरू होत आहे, अशीही माहिती योगेश कुष्टे यांनी दिली आहे. “Sangeet Deobabhali” drama experiment in Chiplun

