भाजपा शहराध्यक्ष संगम मोरे यांचे न.पं. ला निवेदन
गुहागर, ता. 04 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या आरे येथील पंप शेड दुरुस्ती कामाच्या निकृष्ट दर्जा बद्दल भारतीय जनता पार्टीचे गुहागर शहराध्यक्ष संगम मोरे यांनी निवेदन दिले आहे. Sangam More’s N.P. Statement


आरे येथील पंप शेड दुरुस्ती कामात पंप शेडच्या भेगाळलेल्या भिंती व पायाचे काम न करता शेडचे काम सुरु केले गेले आहे, त्या भेगाळलेल्या भिंतींवरच नवीन बांधकाम करत जांभ्या दगडाच्या तीन रांगा चढवण्यात आल्या आहेत. व त्यावर नवीन शेड बांधण्यास सुरवात करून निम्म्या पेक्षा अधिक काम झाले आहे. सदर पंप शेडमध्ये नगरपंचायत कर्मचारी दिवसातून दोनवेळ पाणी सोडण्याकरता पहाटे व संध्याकाळी जात असतात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. Sangam More’s N.P. Statement


या कामाचा निधी सुमारे १,५१,८७६ /- इतका आहे. या रक्कमेतून संपूर्ण शेड आणि पंप हाऊस बांधून झाले असते. परंतु, अजब नगरपंचायतचा गजब कारभार सुरू आहे, असे श्री. मोरे यांनी सांगून गुहागर शहराचा विकास व्हावा, पण तो स्वच्छ आणि पारदर्शकपणे व्हावा, असे शहराध्यक्ष संगम मोरे यांनी सांगितले. Sangam More’s N.P. Statement