न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेची विद्यार्थिनी
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी व एस. आर. दळवी फाउंडेशन मुंबई, शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ सप्टेंबर २०२३ रोजी जागतिक ओझोन दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा संपन्न झाली. या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या प्राथमिक गटात पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने जिल्ह्यात व गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केला. Samriddhi Ambekar first in Essay Competition

कु.समृद्धी आंबेकर हीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सुयश संपादन केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयामध्ये विविध उपक्रम, स्पर्धा, शालेय कार्यक्रम अशा शालेय उपक्रमांमध्ये तिचा नेहमी सहभाग असून ती सुयश संपादन करते. कु.समृद्धी आंबेकर हिला विज्ञान शिक्षक श्री.के. डी. शिवणकर, मराठी विषय शिक्षक श्री.एस. एम. आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. Samriddhi Ambekar first in Essay Competition
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष श्री.रवींद्र इनामदार, कार्यवाह श्री. प्रभाकर सनगरे व पदाधिकारी, एस. आर.दळवी फाउंडेशन मुंबईचे संस्थापक आबा दळवी, श्रीम.सिता दळवी , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. सुदेश कदम, सचिव श्री. श्रीधर जोशी, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा श्रीम. सुचिता वेल्हाळ, सचिव श्री. सुधाकर चव्हाण, मुख्याध्यापक श्री. व्ही.डी. पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. Samriddhi Ambekar first in Essay Competition
